स्मार्ट बुलेटिन : 07 नोव्हेंबर 2021 : रविवार : एबीपी माझा


महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. एसटीच्या संपावर तोडगा काढण्यास राज्य सरकार तयार, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करणार

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आज (रविवारी) आणखी एक मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. त्याबाबत त्यांनी ट्वीट करुन माहिती दिली होती. मात्र पत्रकार परिषदेच्या आधी नवाब मलिक यांनी एक ऑडियो क्लिप ट्वीट केली आहे. या क्लिपमध्ये सॅनविल डीसूजा आणि NCBचे अधिकारी व्ही व्ही सिंह यांच्यातील संवाद असल्याचा दावा मलिकांनी केला आहे. 

2. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी नवाब मलिक आज नवा गौप्यस्फोट करणार, समीर वानखेडेंची गच्छंती आणि कम्बोज यांच्या आरोपांवर काय बोलणार याकडे लक्ष

3. आर्यन खानवरील कारवाई ठरवून केली, साक्षीदार विजय पगारेंचा धक्कादायक आरोप, वानखेडे आणि सुनील पाटील यांच्यात संभाषण झाल्याचाही दावा

4. ‘माझ्या मुलांनी मित्र गमावले आणि मला ड्रग पेडलरची बायको म्हणून हिणवलं गेलं….’ ; नवाब मलिकांच्या मुलीकडून खंत व्यक्त 

5. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अग्नितांडवात 11 कोरोनाबाधितांचा मृत्यू, मागच्या दुर्घटनांमधून कोणताच धडा न घेतल्याचं उघड, नेते मात्र राजकारणात मश्गुल

पाहा व्हिडीओ : Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 07 नोव्हेंबर 2021 : रविवार : एबीपी माझा

6. मुंबईच्या कांदिवलीत हंसा हेरिटेज इमारतीच्या 14व्या मजल्याला आग, 2 वृद्ध महिलांचा मृत्यू, 5 जणांना वाचवण्यात यश

7. पंढरपुरातल्या विठ्ठलाचं 24 तास दर्शन, कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी जास्त वेळ मिळावा म्हणून दिवसरात्र मंदिर सुरु ठेवणार

8. थकीत ऊसबिल मागणाऱ्या शेतकऱ्याला माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्याकडून शिवीगाळ; व्हिडीओ व्हायरल, सर्व स्तरातून संताप व्यक्त 

9. आफ्रिकन देश सिएरा लिओनमध्ये मोठी दुर्घटना, तेलाच्या टँकरला ट्रक धडकल्यानं स्फोट, 100 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

10. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या विजयासाठी भारतीयांकडून देव पाण्यात, न्यूझीलंड पराभूत झाला तरच भारताला सेमी फायनलचं तिकीटSource link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here