Google search engine
HomeUncategorizedPune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त...

Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर…


प्रख्यात रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक यांचे पुण्यात निधन

बाराशे मराठी कादंबऱ्या लिहिणारे प्रख्यात रहस्यकथाकार व गोमंतकीय लेखक गुरुनाथ नाईक यांचे आज निधन झाले. नाईक गेल्या काही महिन्यांपासून गंभीर आजाराने ग्रस्त होते. मात्र, त्यांनी आज वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. नाईक यांच्या कादंबर्‍यांना बाजारात चांगली मागणी होती. कॅप्टन दीप, मेजर भोसले ही त्यांची पात्रे रहस्यकथा वाचणार्‍या वाचकांच्या मनात घर करून बसली आहेत.  गुरुनाथ नाईक हे मूळचे गोव्याचे होते. त्यांनी लोंढ्यात प्राथमिक शिक्षण घेऊन उच्चशिक्षणासाठी बेळगाव गाठले. गुरुनाथ यांनी रहस्यकथा लिहण्यापूर्वी 1975 ते 1963 च्या काळात विविध विषयांवर लिखाण केले. याच काळात त्यांनी अनेक मराठी मसिकांतून हेमचंद्र साखळकर आणि नाईक या नावांनी लिखाण केले. एवढेच नव्हेतर, त्यांनी आकाशवाणीच्या पुणे केंद्रासाठी काही संगीतिका, तर गोवा केंद्रासाठी काही श्रुतिका त्यांनी लिहिल्या.

पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागात पावसाची हजेरी

पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. लक्ष्मीपूजन नंतर फटाके फोडणाऱ्यांच्या आनंदावर पाणी. फटाके फोडणाऱ्यांनी धरली घरची वाट. अचानक पाऊस आल्याने अनेकांची भंबेरी उडाली आहे. 

Pune Coronavirus Vaccination : पुण्यात तीन दिवस लसीकरण (Pune Vaccination) बंद राहणार आहे. पुण्यातील सरकारी रुग्णालयामध्ये गुरुवार, शनिवार आणि रविवारी म्हणजेच, लसीकरण होणार नाही. शुक्रवारी केवळ सकाळच्या सत्रात लसीकरण करण्यात येणार आहे. दिवाळीमध्ये लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. लशीचा पहिला डोस 18 वर्षांवरील 100 टक्के पुणेकरांनी घेतला आहे. आता नागरिकांनी दुसरा डोस घ्यावा यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. पुण्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनालसीकरणाचा वेग वाढला आहे. पण, दिवाळीमुळे केंद्रावर येऊन लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे येत्या उद्या (गुरुवारी) नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन असल्यानं केंद्रावर लसीकरण होणार नाही. शुक्रवारी सकाळच्या सत्रात हे लसीकरण होईल. दुपारनंतर केंद्र बंद राहणार असल्यामुळे त्यानंतर येत्या शनिवारी आणि रविवारीसुद्धा लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली आहे. Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments