Maharashtra Corona Update : राज्यात मंगळवारी 802 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 802 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 886  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 57  हजार 149 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.6 टक्के आहे. 
 
राज्यात आज 17 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 14 हजार 959  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1,49,126 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 994  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 31 , 04, 874 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

मुंबईत आज 238 रुग्णांची भर तर चार जणांचा मृत्यू

गेल्या 24 तासात मुंबईत 238 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर चार रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 276 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शहराचा रिकव्हरी रेट हा 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या 3326 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. शहरात आतापर्यंत 7,35,135 रुग्णं कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 1832 दिवसांवर पोहोचला आहे. तसेच शहरातील कोरोना वाढीचा दर हा 0.04 टक्के इतका झाला आहे. 

 देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 12 हजार 729 रुग्णांची नोंद

 देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव घटताना दिसत आहे. पण अद्याप धोका टळलेला नाही. देशात अद्यापही दैनंदिन मृतांचा आकडा जास्त आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 12 हजार 729 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 221 रुग्णांनी जीव गमावला आहे. अशातच कोरोना प्रादुर्भावापासून आतापर्यंत देशात एकूण 4 लाख 59 हजार 873 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 12 हजार 165 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एक लाख 48 हजार 922 सक्रिय रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत 3 कोटी 37 लाख 24 हजार 959 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here