Google search engine
HomeUncategorizedDiwali Padwa 2021 Know About Religious Importance History And Significance Of Balipratipada

Diwali Padwa 2021 Know About Religious Importance History And Significance Of Balipratipada


Diwali Padwa balipratipada 2021 : दिवाळीची सुरुवात झाल्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी  कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो.  पौराणिक महत्त्व असलेल्या आणि कृषिप्रधान संस्कृतीचे प्रतिबिंब दाखवणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवाळी पाडव्याचा सण शेतकरी राजा मोठ्या उत्साहाने साजरा करतो.  ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते.  

आज 5 नोव्हेंबर शुक्रवारी बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा  आहे. कोरोनाचा काळ असला तरी यंदा दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून हा सण ओळखला जातो. या दिवशी  खरेदी करण्याची पद्धत आहे. या दिवशी सोने, गाड्या किंवा संपत्तीची खरेदी केली जाते. 

काय आहे कथा
बलिप्रतिपदेच्या विषयी अशी कथा सांगितली जाते की,  पार्वतीने शंभू महादेवांना याच दिवशी द्युत खेळात हरवले म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही म्हटले जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजाहितदक्ष राजा म्हणून बळीराजाची ओळख होती‌. दानशूर म्हणूनही हा राजा विख्यात होता. पण, पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला. बळीराजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. भगवान विष्णूंनी वामनाचा अवतार धारण केला आणि बटूवेशात बळीराजा समोर उभे राहिले. या रुपात वामनाने तीन पावले भूमी मागितली.
 
बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखविली तेव्हा वामन अवतारी भगवान विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने मस्तक पुढे केले. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनाने त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले. असं सांगितलं जातं की, बळीराजा गर्विष्ठ झाला तरीही सत्त्वशील, दानशूर या गुणांमुळे बळीराजाला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वरदान दिले की, कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments