Google search engine
HomeUncategorizedविषमुक्त शेतीसाठी धाडस गरजेचे

विषमुक्त शेतीसाठी धाडस गरजेचे


म. टा. प्रतिनिधी, बारामती

‘विषमुक्त सेंद्रीय शेतीमुळे रासायनिक खतांच्या तुलनेत उत्पादन कमी मिळते. आज भारतासह जगामध्ये विषमुक्त भाजीपाला व अन्नधान्यासाठी लोक पाहिजे ती किंमत द्यायला तयार आहेत. त्यामुळे तुलनेत उत्पादन कमी मिळाले, तरी किंमत चांगली मिळणार असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. त्यामुळे विषमुक्त शेतीसाठी शेतकऱ्यांचे धाडस गरजेचे आहे,’ असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.

महाऑरगॅनिक अँड रेस्यूड्यू फ्री फार्मस असोसिएशन (मोर्फा) या शेतकरी कंपनी अंतर्गत ‘हेल्दी हार्वेस्ट’ या सेंद्रिय व विषमुक्त अॅग्रीमॉलचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते गुरुवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर अध्यक्षस्थानी होते. ‘मोर्फा’चे व्यवस्थापकीय संचालक युगेंद्र पवार, प्रभाकर देशमुख, अंकुश पडवळे, प्रल्हाद वरे, स्वाती शिंगाडे, अॅड. परशुराम कापसे, गितांजली कापसे आदी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, ‘राज्यातील दोन तालुक्यांची नावे मी आत्ता सांगत नाही. तेथील शेतकरी भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतात. किटकनाशकांच्या बंदोबस्तासाठी तेथे औषध फवारणी सर्रास केली जाते. त्यामुळे तेथे कर्करोगाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येत आहेत.’ ५० वर्षांपूर्वी काटेवाडीत त्यांच्या घरी असलेल्या द्राक्ष बागेचे उदाहरण सांगताना पवार म्हणाले, ‘त्यावेळी रोज आम्हाला बागेवर औषध फवारणीचे काम करावे लागत असे. अशी औषधे अपायकारक आहेत. असे पदार्थ शरीरात गेल्यावर अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. राज्यात माण तालुक्यातील मूग, आजऱ्यातील घणसाळ तांदूळ लोकप्रिय आहे. मंगळवेढ्याची मालदांडी ज्वारी आजही प्रसिद्ध आहे. त्यावर फवारण्या होत नाहीत. त्यामुळे त्या शरीराला उपकारक नाही.’Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments