बारामतीत पवार कुटुंबीयांची दिवाळी, अजितदादा गैरहजर; शरद पवारांनी सांगितलं कारण


बारामतीः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे दरवर्षी दिवाळी पाडव्यानिमित्त कार्यकर्त्यांना भेटतात. तसंच, संपूर्ण पवार कुटुंबीय बारामतीत दिवाळीनिमित्त दरवर्षी एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात. यंदाही बारामती येथील अप्पासाहेब पवार ऑडिटोरिअममध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले असून पवार कुटुंबीयांची भेट घेत आहेत. यावेळी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), आमदार रोहित पवार (Rohit pawar) उपस्थित आहेत. मात्र, या कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र गैरहजर आहेत. शरद पवार यांनी अजित पवार (Ajit Pawar) कार्यक्रमाला का हजर राहू शकले नाहीत याबाबत खुलासा केला आहे.

बारामतीत दिवाळी भेट निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातील करोना संसर्ग, एसटी कर्मचाऱ्यांचा संप या बाबत भाष्य केलं आहे. तसंच, अजित पवार दिवाळी कार्यक्रमाला का उपस्थित नाहीत याबाबतही शरद पवारांनी उत्तर दिलं आहे.

वाचाः तुरुंगातून सुटल्यानंतर पहिल्यांदाच आर्यन खान आज एनसीबीसमोर हजर होणार

‘अजित पवारांच्या घरी तीन कर्मचारी व दोन वाहनचालकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. आजच त्यांचे करोनाचे अहवाल आले आहे. अजित पवार यांचीही करोनाची चाचणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल येणं अजून बाकी आहे. त्यामुळं खबरदारी म्हणून अजित पवार यांना आम्हीच कार्यक्रमाला येऊ नका, असं सुचवलं आहे. असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

‘गेली दोन वर्षे सर्वांना दिवाळीचा आनंद घेता आला नाही. आता करोनाचे संकट हळूहळू कमी होत आहे. त्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामुळं यंदाची दिवाळी जनतेला साजरी करता येत आहे. पण करोना नियमांची तयारी असायला हवी आणि ती दिसते,’ असंही पवारांनी म्हटलं आहे.

वाचाः … त्यामुळंच केंद्रातील सरकारला हे शहाणपण सुचले; शिवसेनेनं सांगितलं कारण

‘पेट्रोल डिझेल दरावरदेखील शरद पवारांनी भाष्य केलं आहे. राज्य सरकारशी बोलावं लागेल. केंद्राने राज्याचं जीएसटी कृपा करुन लवकर द्यावे म्हणजे जनतेच्या हिताचा निर्णय लवकर घेणं शक्य होईल, असंही पवारांनी सुचवलं आहे. तसंच, एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा,’ असं आवाहनही त्यांनी केलं आहे.Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here