‘पीएमपी’ प्रवासात दागिनेचोरी सुरूचम. टा. प्रतिनिधी,

‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’च्या () बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून चोरट्यांनी दीड लाख रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना बुधवारी (३ नोव्हेंबर) दुपारी सव्वादोनच्या सुमारास कात्रज ते दांडेकर पूल या प्रवासादरम्यान घडली.

या प्रकरणी ४५ वर्षीय महिलेने दत्तवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास कुटुंबीयांसह कात्रज ते निगडी बसने प्रवास करत होत्या. बसमधील गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून दीड लाखांचे दागिने चोरले. काही वेळानंतर महिलेने पर्समध्ये पाहिले असता, दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी दत्तवाडी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी पोलिस नाईक आर. आर. शिंदे तपास करीत आहेत. दरम्यान, पोलिसांसह पीएमपी प्रशासनाकडूनही बसमधील चोरीच्या घटनांना आळा घालण्याचा कोणताही प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळे ही जबाबदारी कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महिलांनी घ्यावी काळजी

बसमध्ये प्रवासादरम्यान अनेक महिला प्रवासी अंगावरील दागिने चोरांच्या भीतीने जाणीवपूर्वक पर्समध्ये काढून ठेवतात. मात्र, अंगावरील दागिने चोरण्याच्या घटना तुलनेने कमी घडत असून, पर्स किंवा पिशव्यांमध्ये ठेवलेल्या ऐवजावरच चोरटे डल्ला मारत आहेत. त्यामुळे महिलांनी दागिने पर्समध्ये ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दुचाकी जाळणारा अटकेत

गहाण ठेवलेली दुचाकी परत न दिल्याच्या रागातून दुचाकी पेटविणाऱ्यांना दोघांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. ही घटना बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास पर्वती दर्शन परिसरात घडली. नवीन रमेश धावडे (वय ३९) आणि प्रकाश शंकर जाधव (वय ४६, रा. पर्वती दर्शन) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी सुनील भोसले (वय ५२ यांनी) दत्तवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींच्या मामाने सुनील भोसले यांच्याकडून पैसे उसने घेऊन त्यांची दुचाकी गहाण ठेवली होती. ती दुचाकी परत न दिल्याच्या रागातून आरोपींनी बुधवारी पहाटे भोसले यांच्या घरासमोरील दोन्ही दुचाकी पेटवल्या. या प्रकरणी उपनिरीक्षक बी. पी. शिरसाठ तपास करत आहेत.Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here