Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर…


Pune Coronavirus Vaccination : पुण्यात तीन दिवस लसीकरण (Pune Vaccination) बंद राहणार आहे. पुण्यातील सरकारी रुग्णालयामध्ये गुरुवार, शनिवार आणि रविवारी म्हणजेच, लसीकरण होणार नाही. शुक्रवारी केवळ सकाळच्या सत्रात लसीकरण करण्यात येणार आहे. दिवाळीमध्ये लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. लशीचा पहिला डोस 18 वर्षांवरील 100 टक्के पुणेकरांनी घेतला आहे. आता नागरिकांनी दुसरा डोस घ्यावा यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. 

पुणेकरांचा लसीकरणाला उत्तम प्रतिसाद देत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईच्या तुलनेत पुण्यातील लसीकरण वेगानं सुरु आहे. अशातच पुण्यात 18 वर्षांवरील 100 टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. दरम्यान, आता सणासुदीच्या दिवसात लोक कामांमध्ये गुंतलेली असतात. त्यामुळे लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. तसेच दिवाळी पाडव्याच्या दिवशी लसीकरण केंद्राचे कामकाज अर्धा दिवस सुरू राहील, अशी माहिती पुणे महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली आहे. 

पुण्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनालसीकरणाचा वेग वाढला आहे. पण, दिवाळीमुळे केंद्रावर येऊन लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे येत्या उद्या (गुरुवारी) नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन असल्यानं केंद्रावर लसीकरण होणार नाही. शुक्रवारी सकाळच्या सत्रात हे लसीकरण होईल. दुपारनंतर केंद्र बंद राहणार असल्यामुळे त्यानंतर येत्या शनिवारी आणि रविवारीसुद्धा लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली आहे. 

गुरुवार, शनिवार आणि रविवार हे तीन दिवस तसेच, शुक्रवारी दुपार वगळून इतर दिवशी लसीकरण नेहमीप्रमाणे सुरळीत सुरु असणार आहे. दिवाळीच्या दिवसांत लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे हा निर्णय बंद ठेवण्यात येणार आहे. 

राज्यात 30 नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरण करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विक्रमी संख्येने दर दिवशी कोरोना लस देण्याची राज्याची तयारी आहे. यापूर्वी देखील तसे डोस दिले आहेत. आता लसीकरणाला अधिक गती आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या 30 नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे 100 टक्के लसीकरण व्हावं, असं उद्दिष्ट्य जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेSource link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here