अन्न वस्त्र निवाराआपला जिल्हामहाराष्ट्र

१९९१ पासून वास्तव्यात असलेल्या गायरानावरील घरे कायम करावे- वंचित बहुजन आघाडी

सुप्रीम कोर्टात अतिक्रमण हटविण्यासाठी दिलेला निर्णयावर पुर्नविचार याचिका सुप्रिम कोर्टात दाखल करावी.

निलंगा तालुक्यातील जवळपास ४४ गावतील एकूण ४३९५ घरावर हातोडा पडणार असुन हजारो लोक बेघर होऊन रस्त्यावर येण्याची वेळ!

निलंगा प्रतिनिधी :- निलंगा तालुक्यातील जवळपास ४४ गावतील एकूण ४३९५ घरावर हातोडा पडणार असुन हजारो लोक बेघर होऊन रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. किल्लारी परिसरात भुकंप झाल्यानंतर तेथील नागरिकांना राहण्याची सोय करण्यात आली त्यांना पक्के घरे देखील बाधुन देण्यात आले त्यांच वेळ निलंगा तालुक्यात देखील भुकंपाची झळ बसली होती त्यामुळे यांच्या कडे कोणीही लक्ष दिले नाही तेव्हा येथील नागरिकांना जागा भेटेल तेथे वास्तव केले.

आज तागायत १९९१ पासून आजपर्यंत एकाच ठिकाणी वास्तव असल्याने याच ठिकाणी वाडी वास्त्या बसल्या आहेत. आता कोर्टाने अचानक गायरान रिकामे करण्याचे आदेश दिल्याने संपूर्ण ४४ गावातील लोक चिंतेत आहेत. आयुष्य भराची कमाई घर बाधण्यासाठी घातले . त्यात आता कोर्टाने घरे खाली करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या लोकांनी कोठे जावे हा प्रश्न त्यांच्या समोर आवासुन उभा आहे.
लोकांनची भावाना लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारीयांच्या तर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यात १९९१ च्या पुर्वीपासून शासकीय गायरान जमिनीवर घरे करून वास्तव्यास आहेत. माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गायरान जमिनीवर वास्तव्यास असणाऱ्याना कायम करण्याचा निर्णय घेतला.

या बाबत तहसिल व पंचायत समिती प्रशासनाने सदरील घरे नियमित करण्याचे काम सुरू हि केले होते. परंतु अचानक मा. सर्वोच्च न्यायालयाने हि प्रकिया स्थगिती करून अतिक्रमण हठविण्याणे आदेश दिल्यामुळे प्रशासनाने नियमीत करण्याचे काम हातात घेतलेले अचानक पणे थांबवून घराचे अतिक्रमण तात्काळ हटविण्याचे नोटीस संबधीत कुटुंबाला देऊन सदरील कुटुबांना अडचणीत टाकण्याचा प्रयत्न केला आहे. सदरील कुटुंबातील व्यक्ती अत्यंत भयभीत झाले असुन त्यांच्या मध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून या प्रकरणात महाराष्ट्र शासनाने विशेष लक्ष घालून सुप्रीम कोर्टात अतिक्रमण हटविण्यासाठी दिलेला निर्णयावर पुर्नविचार याचिका सुप्रिम कोर्टात दाखल करावी.

अशी मागणी वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिकारी यांनी केले आहे. या वेळी तालुका अध्यक्ष- सुनील सुर्यवंशी, जिल्हा महासचिव सय्यद सलीम साहेब, जिल्हा उपाध्यक्ष-हमीभाई शेख,महिला तालुका अध्यक्ष- चंदनाताई सुर्यवंशी, तालुका महासचिव- देवदत्त सुर्यवंशी, तालुका उपाध्यक्ष – दत्तु गायकवाड, शहर अध्यक्ष – महम्मद लालटेकडे यांच्या सह रजनीकांत सोनकांबळे, श्याम मोरे,मेघराज मोरे,निकेष कांबळे,संदिप सुर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button