लोक प्रेरणाशेती विषयक

सादोळ्या येथील शेतकरी बबन धरपडे यांच्या शेतात तहसीलदार वर्षा मनाळे च्या हस्ते वृक्षारोपण

धरपडे कुंटुबाने केला ४८ वर्ष शासन दरबारी संघर्ष

माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )
तालुक्यातील सादोळा येथील शेतकरी बबन धरपडे यांना ४८ वर्षापर्वी
शासनाकडून सीलींगमधील जमीन मिळाली होती परंतु त्यांचा ताबा नव्हता. सदर जमीन प्रकरणी सर्व कागदपत्रांची पहाणी करून तहसीलदार वर्षा मनाळे यांनी रितसर मोजणी करून ताबा मिळवून देवुन त्या शेतात वृक्षारोपण ही करण्यात आले.
सदर जमीन ज्यांच्या ताब्यात होती ते ताबा मिळवु देत नव्हते धरपडे कुंटुबाने ४८ वर्ष शासन दरबारी संघर्ष केला व आताच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार वर्षा मनाळे यांच्याकडे हे प्रकरण गेले त्यांनी तात्काळ या प्रकरणी लक्ष घालुन ४८ वर्ष जमीनीसाठी संघर्ष करणाऱ्या धरपडे कुंटुबाला स्वतः जावुन जमीनीची मोजनी करून जमीन ताब्यात दिली. म्हणून त्यांचा शेतकरी कुंटुबीयानी दि.२१ जुलै २०२२ गुरूवार रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सत्कार करून त्याच्या हस्ते शेतामध्ये वृक्षारोपण केले. या वेळी मा. जिल्हा परिषद सदस्य बबनराव सरवदे, पञकार दत्ता येवले, खानापुरचे सरपंच शंकराव आबुज, कमलाबाई धरपडे, ओबीसी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष विलास नेमाणे, विष्णूपंत गायकवाड , जगन्नाथ गायके, माजी सरपंच अशोकराव आबुज, रूस्तुम धरपडे, शालन ताई धरपडे, आदी उपस्थित होते.

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button