वर्तमान महाराष्ट्रशब्दांचे पुष्पसंपादकीय

सदधम्म सेवा संघाचे कार्याध्यक्ष आसाराम जावळे यांचे निधन

सामाजीक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिति

सदधम्म सेवा संघाचे कार्याध्यक्ष आसाराम जावळे यांचे निधन
माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )
सदधम्म सेवा संघ माजलगाव कार्याध्यक्ष आसाराम ( हौसाराम ) लिंबाजी जावळे ६२ वर्षे यांचे अल्पशा आजाराने औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान ७ सप्टेंबर बुधवार रोजी दुपारी ३ वा. निधन झाले. आसाराम ‌जावळे यांचे बौध्द धम्माच्या विचारांची जडण घडण करण्यात मोठे योगदान आहे. त्यांच्या पार्थीवार ७ सप्टेंबर बुधवार रोजीच्या रात्री उशीरा माजलगाव शहरातील मंगलनाथ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी सामाजीक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिति होती. आसाराम जावळे यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहीत मुले, तीन मुली, सुना नातवंडे एक भाऊ असा परीवार आहे.

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button