दिपावली विशेषशैक्षणिक

श्री शामगीर विदयालयात दिपोत्सव साजरा.

२००८ चे दहावी बँच मधील सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते.

निलंगा तालुका प्रतिनिधी :- महेश शेळके

निलंगा तालुक्यातील शिवणी कोतल येथील माजी विदयार्थी यांनी श्री शामगीर विदयालयात दिपोत्सव आनंदात साजरा केला. प्रत्येक दिवाळी ला माजी विदयार्थी यांच्या तर्फे शाळेत एक हजार एक दिप लावून दिपोत्सव साजरा करण्यात आला. शाळेप्रती आपण काही तरी देण लागतो. प्रत्येक जण आपापल्या घरी दिवाळी साजरा करतो त्याच पद्धतीने शाळेत हि दिवाळी साजरी व्हावी यासाठी प्रत्येक वर्षी दिवाळी साजरी करण्यात येते. तसेच या वेळची दिवाळीतील दिपोत्सव श्री शामगीर विदयालयाचे सचिव कै. आंबादास लांडगे यांना संमर्पित करण्यात आले.

यावेळी २००८ चे दहावी बँच मधील सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते. यात अधिल मिरगाळे,महेश वंटे, भागवत कोरे,विजय शेळके, बिरूदेव दुधभाते, संकेत आयतनबोने, मेघराज गुरणे, गणेश वाघमारे, नंदकुमार दुधभाते, लखन कोरे,भरत वाघमारे, यांच्यासह योगेश वंटे, सुमित वाघमारे, शरणाप्पा कल्लशेट्टी, रोहित शेळके, प्रविण वाघमारे, लिंगाप्पा कल्लशेट्टी, यांच्या सह आजी व माजी विदयार्थी उपस्थित होते.

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button