पोलिस वार्ता

शिऊर येथील एकाची गळफास घेऊन आत्महत्या

निलंगा पोलीस ठाण्याचे आर. ऐ. पटेल व शरद माने यांनी घटनास्थळी

वर्तमान महाराष्ट्र
सहसंपादक :- दत्ता कांबळ /लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील शिऊर येथील गोविंद यशवंत बनसोडे वय ४७ यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दिनांक २३ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजन्याच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये असलेले पिपळाच्या वृक्षाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, गोविंद यशवंत बनसोडे ही व्यक्ती स्वतःच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आहे. याबाबत मयताचा पुतण्या विश्वजीत व्यंकट बनसोडे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून निलंगा पोलीस ठाण्याचे आर. ऐ. पटेल व शरद माने यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा करून निलंगा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू नंबर ५६/२०२२ कलम १७४ सी.आर.पी. प्रमाणे दाखल केले.
गोविंद बनसोडे यांच्या पश्चात तीन मुली एक मुलगा असा परिवार आहे.

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button