आपला जिल्हावर्तमान महाराष्ट्र

वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारा विरोधात पात्रुड येथील ग्रामस्थांचा ४ आगस्ट रोजी रस्ता रोको

हजारोच्या संख्येने ग्रामस्थ होणार सामील

माजलगाव / प्रतिनिधी
तालुक्यातील पात्रुड येथील वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारा विरोधात ग्राम पंचायत व ग्रामस्थांनी ४ ऑगस्ट रोजी पात्रुड येथून जाणाऱ्या खामगाव_ पंढरपूर राज्य महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. पात्रुड येथे ३३ केवी सब स्टेशन असून सुद्धा आठ आठ दिवस वीज गायब आसते. अनेक वेळा वीज वितरण कंपनीला निवेदन देऊन सुद्धा वीज वितरण कंपनीचे कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत. ग्रामपंचायतीच्या न माध्यमातून अनेक वेळा वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन पात्रुड येथे गावठाण करण्याची मागणी केली होती. पण वीज वितरण कंपनीच्या लोकांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे  पात्रुड येथील ग्रामस्थांना नाहक विजेचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याकरिता दि. ४ ऑगस्ट रोजी पात्रुड येथुन जाणाऱ्या खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलनास हजारोच्या संख्येने ग्रामस्थ सामील होणार असून ते पुढील मागण्यासाठी आंदोलन करण्याच्या पवित्र्यावर ठाम आहेत. गावातील सर्व डीपींची दुरुस्ती करण्यात यावी. गावातील सर्व डीपीच्या ट्रांसफार्मर ची पूर्तता करण्यात यावी, गावात कार्यरत असणारे कर्मचारी हे ग्रामस्थांना अरेरावीची भाषा वापरत असल्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, पात्रुड हे मोठे गाव असल्यामुळे व सिंगल फेजचा त्रास येथील ग्रामस्थांना होत असल्यामुळे पात्रुड येथे गावठाण करण्यात यावे, तसेच फोनवरील लोंबकळत असलेल्या तारा व रहदारीस अडथळा ठरणारे विद्युतपोलची दुरुस्ती करण्यात यावी या मागण्यांचे निवेदन वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना व ग्रामीण पोलीस स्टेशन माजलगाव. यांना देण्यात आले आहे. अशी  माहिती पात्रुड चे सरपंच अॅन्ड कजीम मनसबदार. उपसरपंच शेख युसूफ यांनी दिली दिली आहे.

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button