अवर्गीकृत

वाघमारे सिस्टर नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त

वाघमारे सिस्टर नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त

माजलगाव ( पृथ्वीराज निर्मळ )
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र किट्टी आडगाव येथील आरोग्य साय्यहिका श्रीमती वाघमारे आशा ह्या आज ३१ मे रोजी नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त झाल्या. त्यांनी ३५ वर्ष आरोग्य खात्यात यशस्वी रित्या कर्तव्य पार पाडले. या बद्दल त्याचे तालुक्यात अनेकाने कौतुक करत अभिनंदन केले व हार्दीक शुभेच्छा दिल्या.
तालुक्यात किट्टी आडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य साहाय्यकी श्रीमती वाघमारे आशा ह्या काल ३१ मे रोजी नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त झाल्या त्यांनी कुप्पा, माजलगाव, मंजरथ, मंगरुळ किट्टी आडगाव आदी ठिकाणी आहो राञ गोर गरिब रुग्णांची सेवा केली. उप केद्र मंजरथ येथे राहून उपकेंद्रात त्यांनी वेळी शेकडो डिलेव्हरी केल्या तालुक्यात त्या डिलेव्हरी करण्यात पटाईत होत्या डिलेव्हरी केल्या बद्दल त्यांचा शासन स्तरावरून सन्मान करण्यात आला आहे. आज त्यानी जवळपास ३५ वर्ष निःस्वार्थ पणे रुग्ण सेवा करत आपले कर्तव्य यशस्वी रित्या पार पाडून काल ३१ मे रोजी नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त झाल्या. या बद्दल त्यांचे तालुक्यात अनेक हितचिंतकाडून सन्मान करुन हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन करण्यात आले

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button