शब्दांचे पुष्प

रंगुबाई नारायण पोटभरे यांचे निधन

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या चळवळीत विविध आंदोलन, मोर्चे, जयंत्या मध्ये सक्रिय

रंगुबाई नारायण पोटभरे यांचे निधन

माजलगाव / ( पृथ्वीराज निर्मळ )
येथील जुन्या काळातील सामाजिक कार्यकर्त्या रंगुबाई नारायणराव पोटभरे यांचे आज दिनांक २ /११/ २०२२ रोजी पहाटे तीन वाजता डॉ. देशपांडे हॉस्पिटल येथे निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय ८० वर्षे होते .भीम नगर येथील रोहिणी महिला मंडळाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या रंगुबाई नारायणराव पोटभरे या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या चळवळीत विविध आंदोलन, मोर्चे, जयंत्या मध्ये सक्रिय सहभाग घेत असत व भीम बुद्ध गीते गाऊन प्रबोधनाचे काम करीत असत गेल्या तीन वर्षांपूर्वी त्यांना अर्धांग वायूचा आजार झाल्याने त्या आजारी पडून त्यांचे आज दि. २/११/२०२२ रोजी निधन झाले त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून आज सकाळी १० वाजता येथील सिंदफणा नदीच्या तीरावरील मंगलनाथ स्मशानभूमी येथे अंत्यविधी पार पडला याप्रसंगी विविध क्षेत्रातील सामाजिक, राजकीय व्यक्ती तसेच शिक्षक, वकील, पत्रकार उपस्थित होते त्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील कर्मचारी जितेंद्र पोटभरे यांच्या आई होत्या तर लक्ष्मण पोटभरे यांच्या चुलती होत्या व पत्रकार किशन भदर्गे यांच्या ज्येष्ठ भगिनी होत्या त्यांच्या पाश्चात जितेंद्र, राजेंद्र ही दोन मुले व कमलताई मनोर या मुलगी व सुना नातवंडे, पत्रुंडे असा मोठा परिवार आहे.

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!
Back to top button