ग्रामीण वार्ताबीड जिल्हाशेती विषयक

मोगरा, आनंदगावास मुसळधार पावसाने झोडपले

मोगरा, आनंदगाव येथे मुसळधार पाऊस

माजलगाव/( वर्तमान महाराष्ट्र)
तालुक्यातील मोगरा, आनंदगाव या ठिकाणी दि. २७ जून रोजी आकाशात अचानक पणे ढग जमण्यास सुरुवात झाली. व ढग दाटून आल्यामुळे दुपारी दोन वाजेच्या सुमारास जोरदार, मुसळधार पावसाने तब्बल दोन तास हजेरी लावल्यामुळे शेतीमध्ये पेरणी साठी गेलेल्या शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. व बघता बघता पावसाचा जोर एवढा वाढला की नदी-नाले तुडुंब भरून खळखळून वाहू लागले नदीनाल्यांना पुराचे स्वरूप आले. अशा परिस्थितीत शेतामध्ये गेलेल्या शेतकऱ्यांना नदी नाल्यातून वाट काढत कसेबसे घर गाठावे लागले.
तब्बल दोन तास झालेल्या पावसामुळे नदी-नाले दुथडी वाहू लागले पहिल्यांदाच पावसाने नदी नाल्यांना पूर आल्यामुळे पाणी बघण्यासाठी येथील ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती.

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button