शैक्षणिक

मुप्टा शिक्षक संघटनेच्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी प्रवीणकुमार डावरे यांची निवड

मुप्टा शिक्षक संघटनेच्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी प्रवीणकुमार डावरे यांची निवड

माजलगाव / ( पृथ्वीराज निर्मळ ) शिक्षक प्राध्यापकांच्या न्याय हक्कासाठी गेल्या पंचवीस वर्षापासून लढणाऱ्या शिक्षक संघटनेच्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी प्रवीणकुमार डावरे यांची निवड करण्यात आली आहे. दिनांक १० जून २०२२ रोजी शिक्षक संघटनेची बैठक औरंगाबाद येथे नुकतीच पार पडले . या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक मुप्टा शिक्षक संघटनेचे नेते प्राध्यापक सुनील भाऊ मगरे होते तर प्रमुख उपस्थिती मुप्टा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा.डॉ.संभाजी वाघमारे प्रा.डाॕ. भास्कर टेकाळे, मराठवाडा अध्यक्ष राजेंद्र जाधव, शेख मुनीर हे उपस्थित होते. यावेळी मुप्टा शिक्षक संघटनेचे विभागीय सचीव व नेते प्रा. सुनील भाऊ मगरे यांनी प्रवीण कुमार डावरे यांची मुप्टा शिक्षक संघटनेच्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी निवड केली. प्रवीण कुमार डावरे हे न्यू हायस्कूल आळंद येथे विद्यार्थी प्रिय व उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळखले जातात. त्याच बरोबर मराठवाड्यात छत्रपती शिवाजी महाराज,म. फुले,राजर्षि शाहू महाराज,डाॕ.बाबासाहेब आंबेडकर चळवळ गतिमान करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. सामाजिक समता अभियानच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवून महापुरूषांच्या विचाराची जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा सामाजिक व शैक्षणिक चळवळ गतीमान करणार्‍या सामान्य कार्यकर्त्याला संघटनेचे नेते प्रा. सुनील भाऊ मगरे यांनी न्याय दिला आहे. त्यांच्या निवडीबद्दल प्रा. शशिकांत जावळे ,प्रा. डॉक्टर विठ्ठल जाधव, प्रा.नारायण घोलप, प्रा. जालिंदर वाहुळ,प्रा. ईश्वर डोंगरदिवे, प्रा. बाळासाहेब गव्हाणे, प्रा.इम्रान पठाण, प्रमोद साळवे,अजित वाघमारे,शरद मगर ,अजय मगरे, विश्वनाथ बनकर, प्रा.डाॕ. शहादेव डोंगरे, विजय राऊत, हिरामण डावरे, शरद राठोड, चरणदास ढोकणे,रविंद्र निकम, किशोर बावस्कर ,उज्वल पनाड, मिलिंद सोनवणे,नितीन बिरारे,गणेश निर्मळ, बाबासाहेब डावरे,पंकज उमाळे,पंकज साळवे, विकास उबाळे, वाघमारे, अरविंद लोंढे, विजय डावरे, रोहन किर्ते, हेमंत सौंदरमल ,यांच्यासह मराठवाड्यातून अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button