लोक प्रेरणावर्तमान महाराष्ट्रसंपादकीय

माजलगाव येथे जैन पर्युषण पर्वाची संवत्सरी महापर्वाने उत्साहात सांगता

वैजापूर येथील स्वाध्यायी पारस संचेती व प्रकाश बोथरा यांनी आठ दिवस केला धर्म उपदेश

माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )
जैन धर्मात चातुर्मासातील अत्यंत महत्त्वाचे दिवस म्हणजे पर्युषण पर्व. भाद्रपद शुक्ल पंचमीला या पर्वाची सुरुवात होते. हे पर्यूषण पर्व एकूण आठ दिवस चालतात या आठ दिवसात लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्वजण व्रत करतात व शेवटच्या म्हणजेच आठव्या दिवशी या पर्युषण पर्वाची सांगता ही संवत्सरी या महापर्वाने केली जाते.
माजलगाव येथे दि.२४ ऑगस्ट पासून या पर्युषण पर्वाची सुरुवात झाली होती, यामध्ये वैजापूर येथील पारसजी संचेती व प्रकाशजी बोथरा हे दोघे स्वाध्यायी म्हणून धर्म उपदेश देण्यासाठी व जैन धर्मातील अंतगड सूत्र व कल्पसूत्राचे वाचन करण्यासाठी माजलगाव येथे आले होते. या दोन्ही स्वाध्यायींनी अत्यंत उत्कृष्टपणे जैन आगमांचे वाचन करत व अर्थ समजावून सांगत धर्म उपदेश दिला.

पर्युषण पर्वाचे आठही दिवस माजलगाव येथील जैन बांधवांनी विविध ज्ञान, ध्यान, जप, तप, दान करीत साजरे केले. क्षमा हे वीरांचे भूषण आहे असे भगवान महावीरांनी उपदेशात सांगितलेले आहे, त्याला अनुसरून या पर्वाच्या सांगतेत उपासकाने सर्वांची क्षमा मागणे याला या व्रतात विशेष महत्त्व दिले गेले आहे. क्षमा विरस्य भूषणम् या ब्रीद वाक्याला अनुसरून दि. ३१ ऑगस्ट रोजी संवत्सरी दिवशी आलोयना वाचून क्षमायाचना केल्यानंतर पर्युषण पर्वाची उत्साहात सांगता झाली. यावेळी समस्त जैन समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button