Uncategorizedशेती विषयक

महावितरण अधिकाऱ्याने कायदा पायदळी घेऊ नये; अन्यथा कायदा हातात घेऊ – राजकुमार सस्तापुरे

या पुढे कायदा पायदळी घेऊन शेतकर्याचे नुकसान कराल तर कायदा हातात घेऊन आधिकार्याला पायदळी तुडवू

वर्तमान महाराष्ट्र न्यूज :-
प्रतिनिधी नंदकिशोर सूर्यवंशी

देवणी तालुक्यातील वलांडी येथे शेतकरी संघटनेच्या वतीने आज निलंगा उदगीर राज्यमार्ग वलांडी येथे महावितरण च्या मनमानी कारभार च्या विरोधात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे म्हनाले की महावितरण चे आधिकारी हे कायदा पाळत नाहित तर बेकादेशिर वागुन शेतकर्याचे नुकसान करत आहेत. नोटीस न देता शेतकर्याची विजपुरवठा खंडीत करत आहेत शेतीतील रोहित्र नादुरुस्त झाल्यास ४८ तासात दुरुस्त करून देण्याचा कायदा आसताना दोन दोन महिने दुरुस्त होत नाही दुरूस्ती साठी बिल मागण्याची गरज नसताना बिल भरण्याची मागणी करतात, ४८ तासापेक्षा जास्त वेळ लागल्यास तासी ५० ₹ देण्याचा कायदा आसताना नुकसानभरपाई देत नाहीत डिंमाड भरल्यास एक महिण्यात कनेक्शन देण्याचा नियम आसताना वर्ष वर्ष कलेक्शन देत नाहीत तर हे आधिकारी कायदा पायदळी तुडवतात या पुढे कायदा पायदळी घेऊन शेतकर्याचे नुकसान कराल तर कायदा हातात घेऊन आधिकार्याला पायदळी तुडवू आसा इशारा देण्यात आला,यावेळी दगडुसाहेब पडीले, रामराव मेळकुंदे, अरुण पाटील, विनायक पाटील, सोमेश्वर हुरसनले, प्रशांत महाजन, समद शेख,सह परीसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते,तर देवणी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे यांनी चोख बंदोबस्त ठेवले होते.

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button