कला आणि क्रीडासंपादकीय

भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेचे निकाल जाहिर

देवगिरी प्रांतातून माजलगावचे सुरेश देशपांडे प्रथम

माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )
आझादी का अमृतमहोत्सव निमित्त भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने दि.०२/०१/२०२२ रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
माजलगाव येथे या स्पर्धेचे आयोजन संस्कार भारती देवगिरी प्रांताच्या मातृशक्ती प्रमुख श्रीमती स्नेहलताई पाठक यांनी केले होते. यामध्ये ४० कलासाधकांनी सहभाग नोंदवलेला होता. यामध्ये ३ विजेते स्पर्धक देवगिरी प्रांताला मिळाले. यामध्ये सुरेश भगवानराव देशपांडे (माजलगाव) यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला. सोबतच त्यांना रोख रक्कम १०,००० चे बक्षीस मिळाले. द्वितीय क्रमांक भारती शैलेश देशपांडे यांना प्राप्त झाला व बक्षिस रोख रक्कम ५००० मिळाले, तसेच अनघा अनिरुद्ध पत्की (अंबाजोगाई) यांना तृतीय क्रमांक व रोख रक्कम ३००० चे बक्षिस प्राप्त झाले.
यात विशेष म्हणजे देवगिरी प्रांतातून लातूर, माजलगाव, अंबाजोगाई, धाराशिव, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, ईत्यादी ठिकाणच्या कलासाधकांचा सहभाग होता.
या स्पर्धेचे आयोजन तुळजाभवानी माता मंदिर, सन्मित्र कॉलनी, माजलगाव येथे करण्यात आले होते. या रांगोळी स्पर्धेसाठी कलासाधकांचा अतिशय उदंड प्रतिसाद मिळाला होता. यावेळी मंदिरातही जागा कमी पडली. या स्पर्धेसाठी प्राणेश पोरे, श्रीराम देशपांडे, सुरेश भानप, डॉ.मार्तंड नवशिंदे, दिगंबर महाजन, किशोर देशमुख, कुणाल कुलकर्णी व मल्हार जवळेकर यांनी विशेष सहकार्य केले होते.

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button