लोक प्रेरणासंपादकीय

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने संविधान गौरव रॅलीचे आयोजन

अन्यायाच्या विरोधात न्याय मागण्याचा अधिकार संविधान बहाल करते

माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा माजलगाव राष्ट्रीय अध्यक्ष महा उपासिका मीराताई आंबेडकर व येथील क्रांतीसुर्य सेवाभावी संस्था माजलगाव च्या वतीने संविधान गौरव दिवस म्हणून संविधान गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आले. ज्या संविधानाने स्त्रियांना सती जाण्यापासून बचाव करण्याचे काम करून राष्ट्रपती, प्रधानमंत्री बनण्याचे हक्क मिळवून दिले, ज्या समाज व्यवस्थेने लिहिण्याचा बोलण्याचा व शिक्षणाचा अधिकार नाकारला होता तो अधिकार सर्व जाती धर्मातील लोकांना संविधान बहाल करते, ज्या समाज व्यवस्थेने महिलांना दुय्यम दर्जा देत ते संविधानाने स्त्री-पुरुष समानतेचा हक्क प्रदान करते ज्या प्राचीन समाज व्यवस्थेने, श्रेष्ठ व इतर जातींना कनिष्ठ मानत होते तर आता सर्व जाती धर्माच्या लोकांना संविधान समान मान्यता अधिकार बहाल करते, सर्व भारतीय नागरिकांना मग ते कोणत्याही जाती जमातीचे धर्माचे असो त्याच्यावर अन्याय झाला असेल तर त्याला न्याय मागण्याचा अधिकार नव्हता त्यांना तर अन्यायाच्या विरोधात न्याय मागण्याचा अधिकार संविधान बहाल करते, आशा या भारतातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना सर्व अधिकार बहाल करते त्या संविधानाचा गौरव दिन सविस्तर असल्याने माजलगाव येथे भारतीय बौद्ध महासभा व क्रांतीसुर्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने

भव्य संविधान गौरव रॅली दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ शनिवार रोजी सकाळी ठीक ९ वाजता नवीन बस स्थानक माजलगाव

येथून निघून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे शहरातील मुख्य रस्त्याने निघून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून धारूर रोड मार्गे भीम नगर माजलगाव येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे या भव्य संविधान गौरव रॅलीचे महापुरुषांना अभिवादन करून विसर्जन करण्यात येणार आहे. या भव्य संविधान गौरव रॅलीमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष एस. बी. मोरे, कमलताई डोंगरे बी.सी. डोंगरे, लीलाताई उजगर, के. व्ही. साळवे सर, एन. बी. राजभोज, गुलाबराव धाईजे, डी. एस. साळवे, डॉ. भागवत साळवेयांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

भव्य संविधान गौरव रॅलीत सर्व भारतीय नागरिकांनी शुभ्र वस्त्र (घालून) परिधान करून सहभागी व्हावे

असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या यांच्या सह क्रांतीसूर्य बहुउद्देशी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अशोक मगर, उपाध्यक्ष शत्रुघन कसबे, सचिव अश्विन टाकणखार, सहसचिव प्रवीण ओव्हाळ, सदस्य दिनेश निसर्गंध, आदिनाथ लोखंडे, सदानंद प्रधान, संदेश डोंगरे, केतन प्रधान यांच्यासह सर्व क्रांतीसुर्य सेवाभावी संस्थेच्या सदस्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तरी सर्व संविधान प्रेमी भारतीय नागरिकांनी सकाळी ठीक ९ वाजता शुभ्र वस्त्र परिधान करून नवीन बस स्थानक माजलगाव येथे उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button