वर्तमान महाराष्ट्रसंपादकीय

भारताचे महामहीम राष्ट्रपती यांना वडवणी तहसीलदार यांच्या माध्यमातून निवेदन.

मागासवर्गीयांवरील अत्याचारांच्या विरोधात बीड जिल्हा मूलनिवासी संघाच्या वतीने जाहीर निषेध

वडवणी ( प्रतिनिधी) आजच्या आधुनिक युगात आपला भारत देश एका बाजूला स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा करत आहे, तर भारतीय संविधानानुसार प्रत्येक भारतीय नागरिकास जाती, धर्म, क्षेत्र, लिंग व भाषा यांच्या आधारावर कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही, याची खात्री दिली आहे. त्यासोबतच ‘समतेचा अधिकार’ व ‘स्वातंत्र्याचा अधिकार’ दिला गेला आहे.

अशी तरतूद संविधानातील कलम १५ मध्ये करण्यात आली आहे. तसेच शिक्षणाचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क व कलम १७ अनुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे. तरीसुद्धा दिनांक २० जुलै २०२२ रोजी राजस्थान राज्यातील जलौर येथील सरस्वती विद्यालय या शाळेतील इयत्ता तिसरीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या निरागस विद्यार्थ्याची उच्च जातीतील शिक्षकाच्या माठातील पाणी अनुसूचित जातीच्या विद्यार्थी प्यायला.

विद्यार्थी अस्पृश्य असल्याने तो हे पाणी का प्यायला, या जातीयद्वेषातून त्यास बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण झाल्याने हा विद्यार्थी गंभीर आजारी होता व त्याचे दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी दवाखान्यातील उपचार सुरू असताना निधन झाले. या घटनेचा मूलनिवासी संघ जाहीर निषेध करतो. तसेच देशात इतर ठिकाणीही अशा प्रकारच्या अनेक घटना घडत आहे व याचे प्रमाण वाढतच चालले आहे. या घटनांना त्वरित आळा घालण्यात यावा अन्यथा मूलनिवासी संघतर्फे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आंदोलन करण्यात येईल.

या सर्व घटनांचा निषेध म्हणून मूलनिवासी संघातर्फे मा. राष्ट्रपती यांना मा. तहसीलदार साहेब वडवणी यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले आहे. यावेळी मुळनिवासी संघ बीड जिल्हाध्यक्ष कैलास वाव्हळकर, मुळनिवासी संघ बीड जिल्हा मिडिया सचिव अश्विनकुमार डावरे, मुळनिवासी संघ वडवणी तालुकाध्यक्ष विलास काकडे, मुळनिवासी संघ वडवणी तालुका सचिव महादेव भिसे हे उपस्थित होते.

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button