पोलिस वार्तावर्तमान महाराष्ट्र

बिल्कीस बानो अत्याचार प्रकरणी केज येथील हाजारो महिलांचा भव्य मोर्चा तहसीलवर धडकला

बिल्कीस बानो यांच्यावर अत्याचार करणाऱ्या व त्यांच्या नातेवाईकांची हत्या करणाऱ्या ११ जणांची केलेली सुटका रद्द करून त्यांना पुन्हा कठोर शिक्षा द्यावी

आत्तापर्यंतच्या सर्वात मोठा ठरलेल्या मोर्चात मुस्लिम महिलांसह राजकीय व सामाजिक संघटना सामिल

प्रतिनिधी..

गेल्या अनेक दिवसांपासून महिलावरील अन्याय अत्याचारात दिवसेंदिवस सातत्याने वाढ होताना दिसत असुन अन्याय अत्याचार रोखण्यात गृहखाते सपशेल अपयशी ठरल्याचे दिसुन येत आहे.
२००२ साली गुजरात राज्यात बिल्कीस बानो नावाच्या मुस्लिम युवतीवर तेथील ११ आरोपींनी सामुहिक पाश्वी बलात्कार करुन तिच्या कुटुंबातील सर्वांची निर्घृणपणे हत्या केली होती. पिडीत बिल्कीस बानो मयत झाल्याचे पाहुन आरोपींनी तेथुन पलायन केले होते.

मात्र या सर्व घटनेतुन बानो हि वाचल्याने तिने पोलीस स्टेशन गाठुन आरोपीविरुद्ध तक्रार दिल्याने कोर्टात सदरील ११ आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा व बलात्काराचा आरोप सिद्ध होवुन न्यायालयाने वरील सर्व ११ आरोपींना सश्रम अजिवन कारावासाची शिक्षा ठोठावली असताना गुजरात राज्य सरकारने या गुन्ह्यातील आरोपींची वागणूक चांगली असल्याचे कारणावरून सर्वच्या सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केल्याने या निर्णयाविरोधात देशातील मुस्लिम समाजात असंतोष पसरला असुन हा दिलेला निर्णय संविधानाच्या विरोधात आणि लोकशाही पायदळी तुडवत हुकुमशाही पध्दतीने दिला असल्याची खंत व्यक्त करत सर्व महाराष्ट्रभर मुस्लिम समाजासह ईतर ही पक्ष व संघटना या निर्णया विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत.

त्याच अनुशंगाने केज शहरातही, दि. १५ सप्टेंबर गुरुवार रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.  
हा मोर्चा हजरत ख्वाजा मोहजबोद्दिन रहे-दर्गा ते तहसील कार्यालय असा काढण्यात आला. या मोर्चात अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यात प्रामुख्याने

बिल्कीस बानो यांच्यावर अत्याचार करणाऱ्या व त्यांच्या नातेवाईकांची हत्या करणाऱ्या ११ जणांची केलेली सुटका रद्द करून त्यांना पुन्हा कठोर शिक्षा द्यावी

हजरत मोहम्मद यांच्या विषयी प्रत्येक वेळी अपमानजनक टिप्पणी करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करून त्यासाठी कठोर कायदा लागू करावा.


हजरत ख्वाजा मोहजबोद्दिन रहे-दर्गा पासुन तहसिल कार्यालयावर हातात काळे झेंडे घेवुन महिलांचा भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला होता. केज शहरातील निघालेल्या महीलांच्या सर्वात मोठ्या निषेध मोर्च्याने केज शहर हादरून गेले होते. या मोर्चाची सुरुवात ख्वाजा मोहजबोद्दिन रहे-दर्गा येथून सुरुवात करण्यात आली. तर हा मोर्चा दुपारी १२:०० वा. केज तहसील कार्यालयावर धडकला नंतर या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.
या मोर्चात मुस्लिम महिलासह पुरुष व विद्यार्थी ही हाजोरोच्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चाला सर्वपक्षीय पाठिंबा दिल्याने केज शहरातील आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा आणि शांततामय मोर्चा ठरला आहे.

भारतातील अल्पसंख्यांक समुदायावर होणाऱ्या अत्याचारा विरुद्ध कडक कायदा करावीया प्रमुख मागण्यांसाठी केज संविधान संघर्ष बचाव समितीच्या वतीने गुरुवार दि.१५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता.


हा मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी पोलिस प्रशासनाने तगडा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. या मोर्चात जनविकासचे सर्वेसर्वा हारुणभाई ईनामदार , नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड , हानुमंत भोसले, आदींची प्रमुख उपस्थिती होती. तर या मोर्चाला शिवसंग्राम व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) , आणि ईतर सामाजिक तसेच राजकीय पक्षा सह सामिजीक संगठनानी ही भक्कम पाठिंबा दिला. या मोर्चातील मागण्यांचे निवेदन केज तहसीलचे नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी श्री. लक्ष्मण धस यांना देण्यात आले. व मोर्चा शांततेत पार पडला.

 • १४ वर्षांच्या संघर्षातून शाळेला अनुदान मिळवणारे बी.आर. शिंदे यांचा; घोडकेंनी केला सत्कार

  याप्रसंगी घोडके म्हणाले की, शिंदेंनी फार कष्टातून शिक्षण संस्था उभ्या केल्या माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )तालुक्यातील लऊळ येथील सिद्धि विनायक शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बी.आर. शिंदे यांनी दिव्यांग शाळेची उभारणी केली होती. मात्र तीला अनुदानास पात्र ठरविण्यासाठी १४ वर्षे संघर्ष करुन यशस्वी झालेले शिंदे यांचा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे बीड जिल्हा अध्यक्ष नानासाहेब घोडकेंनी …

 • महापरिनिर्वाणदिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना म. ज्यो. फुले विद्यालयात विनम्र अभिवादन

  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे देशासाठीचे योगदान माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र ) येथील महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालयात महापरिनिर्वाणदिनी बाबासाहेबांच्या विचारांचा जागर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून आपल्या वेगवेगळ्या नाटिका, गीत, कविता, तसेच बालसभेच्या माध्यमातून केला व बाबासाहेबांच्या विचारांना विनम्र अभिवादन केले यात सहावी अ मधील विद्यार्थ्यांनी बाल सभेचे आयोजन केले त्यातून त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे देशासाठीचे योगदान व …

 • आमदार श्री ईश्वर खंड्रे साहेबांच्या निधीतून नवा बोरवेल मारायला आज सुरु करण्यात आली.

  भालकी प्रतिनिधि: राजीव किसे भालकी तालुक्यातील सिरमाळी गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी आमदार श्री ईश्वर खंड्रे साहेबांच्या निधीतून नवा बोरवेल मारायला आज सुरु करण्यात आली. गेल्या अनेक दिवसापासून पाण्याच्या समस्ये मुळे गावकऱ्यांचे खूप हाल होत होते गावकऱ्यांनी खड्रे साहेबांची भेट घेऊन समस्या कळविली असता खंड्रे साहेबांनी तात्काळ नवा बोर पाडून दिल्या बद्धल मा. दिलीप …

 • महापरिनिर्वाण दिनानिमित्त रुग्ण हक्क परिषदेचा अखंड २४ तास आंबेडकर विचारांचा जागर!

  मुख्य संपादक: रवि उजगरे (वर्तमान महाराष्ट्र) पुणे विशेष: विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सलग यंदाही दहाव्या वर्षी रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीच्या वतीने ” अखंड २४ तास आंबेडकरी विचारांचा जागर हा कार्यक्रम पुणे स्टेशन येथील आंबेडकर पुतळा येथे आयोजित करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक …

 • गट विकास अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली

  अनेक कर्मचाऱ्यांची नियमबाह्य भरती करुन थकविले वेतन… प्रतिनिधी :- महेश शेळके निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील ग्रामपंचाय असुन अडचण बनली आहे. नाव मोठे आणी लक्षण खोटे असा कारभार सुरु आहे. गेल्या अनेक तीन वर्षांपासून येथील ग्रामपंचायत अनेक भ्रष्टाचारांच्या व बनावट नमुना क्रमांक ८ च्या तक्रारी च्या माध्यमातून सतत चर्चेत आसतानाही आता कर्मचाऱ्यांची पोटमार करण्यावर भर …

 • भाजपा सरकारच्या विरोधात श्री सागर खांद्रे आणि भालकीच्या सर्व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी आज भालकी येथे निदर्शने केली.

  भालकी प्रतिनिधी: राजीव किसे एमबीए, एमसीए, बीफार्मा आदी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या शैक्षणिक वर्षापासून २०२१ ते २२ शिष्यवृत्ती न देणाऱ्या भाजपा राज्य सरकारच्या विरोधात श्री सागर खांद्रे आणि भालकीच्या सर्व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी आज भालकी येथे निदर्शने केली. २०२२-२३ त्यानंतर व्यापक निदर्शने झाली. बीकेआयटी महाविद्यालयापासून सुरू झालेल्या या आंदोलनाने तहसील कार्यालयावर मोर्चा काढला व तहसीलदार …

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button