पोलिस वार्तावर्तमान महाराष्ट्र
Trending

पात्रुड येथुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या धाब्यावर सर्रासपणे विक्री होते दारू

दारूबंदी उत्पादन शुल्क, ग्रामीण पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

माजलगाव/ प्रतिनिधी
तालुक्यातील पात्रुड येथील राज्य महामार्ग क्रमांक ५४८ सि. खामगाव पंढरपूर पालखी मार्गावरील रस्त्यालगत अनेक अशी हॉटेल, धाबे आहेत. परंतु या धाब्यावरती जेवणाच्या नावाखाली मद्याची, दारूची विक्री सर्रासपणे विक्री केली जाते. याकडे माजलगाव ग्रामीण पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
याबाबत थोडक्यात माहिती अशी, की माजलगाव तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ सि. हा महामार्ग खामगाव पंढरपूर गेल्यामुळे येथील महामार्गावर अनेक अशा बड्या बड्यालोकांची शेड वगैरे मारून हॉटेल बांधून ते हॉटेलच्या नावाखाली धाब्यावरती सर्रासपणे दारू विक्री करतात. याबाबत दारूबंदी उत्पादन शुल्क, पोलीस प्रशासनाला माहिती असून सुद्धा पोलीस प्रशासन धाबेचालकाकडुन चिरीमिरी घेत असल्याने मुग गिळुन गप्प बसलेले दिसून येत आहे. व जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. म्हणूनच येथील धाबे चालकांचे मनोधैर्य वाढले असून ते खुलेआम सर्रास पणे दिवसाढवळ्या रात्री, अपरात्री दारू विक्री करत आहेत.
यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, तरुण दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला आहे. या धाबेचालकावर पोलीस प्रशासनाचा अंकुश नसल्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य तर थोडक्यात आलेच असून दारूच्या आहारी गेलेल्या तरुणांच्या संसाराची राख रांगोळी होत असताना दिसत आहे. ऊसतोड मजूर कामगार कारखान्याची उचल उचलून सर्रासपणे धाब्यावर दारू पिऊन पैशाची विल्हेवाट लावत असून अनेकांचे संसार उघड्यावर येत आहेत. या दारूच्या व्यसना पायी घरामध्ये भांडणे,कलह होत असून गावामध्ये दारुडे धिंगाणा घालतात याचा त्रास सर्वसामान्य जनतेस होत आहे. तरी अशा धाबे चालकांचा कायमचा बंदोबस्त करावा. असे गावातील महिला वर्गातून व सर्वसामान्य जनतेतून बोलले जात आहे.
तरी या गोष्टीकडे मा.पोलिस अधीक्षक साहेब , मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, मा. पोलीस निरीक्षक साहेब पो.स्टे. ग्रामीण. यांनी कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी समस्त ग्रामस्थ व महिला वर्गातून होत आहे.

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button