अवस्था आणि व्यवस्था

पात्रुड येथील रोडवरील अवैद्यरित्या प्रवासी वाहतूक करणारा रिक्षा बिंदू AutoPoint हलवा- बशीर हुस्नुद्दीन शेख

एसटी महामंडळाच्या दुर्लक्षामुळे येथील प्रवासी थांबा (बस थांबा) असलेल्या ठिकाणी अतिक्रमण

माजलगाव: पृथ्वीराज निर्मळ

तालुक्यातील पात्रुड येथिल खामगाव पंढरपूर महामार्गावर पूर्वी प्रवाशांना थांबण्यासाठी एसटी बस थांबा होता. मात्र एसटी महामंडळाच्या दुर्लक्षामुळे येथील प्रवासी थांबा ( बस थांबा ) असलेल्या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आलेले असून प्रवाशांना थांबण्यासाठी जागाच नसल्यामुळे येथील हायवेवर बस थांबवावी लागते. त्यातच याच महामार्गावर अवैध वाहतूक करणारी वाहने देखील थांबतात तर माजलगाव व तेलगाव कडे अवैध प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा देखील रोडवर रिक्षा पॉईंट करून सर्रास पणे रोडवर गाड्या भरतात यामुळे येथे अपघाताच्या प्रमाणात देखील वाढ होताना दिसून येत आहे. हेच रिक्षावाले प्रवाशांशी अरेरावी करत रोडवर गोंधळ घालतात यामुळे रस्त्यावर रहदारीचा खोळंबा होतो व याचा नाहक त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागतो.

या ठिकाणी बस थांबा नसल्यामुळे बस कधीकधी या ठिकाणी थांबवण्यास जागाच नसते दोन्ही बाजूने अतिक्रमणाचा विळखा त्यामध्ये रोडवर अवैधरित्या मनमानीपणे उभ्या केलेल्या रिक्षा यामुळे प्रवासी उतरण्यासाठी व बस मध्ये चढण्यासाठी बसला दूर जाऊन उभे करावे लागते.यामुळे प्रवाशांना धावत बस कडे जावे लागते बस मधून उतरणाऱ्या प्रवाशांना दूरवर चालत यावे लागते. याचा जास्तीत जास्त त्रास महिला वर्गास विद्यार्थी व जेष्ठ नागरिकांना होत आहे. यामुळे अपघात होऊन इजा होऊ शकते दोन्ही बाजूनी येणाऱ्या बसेस उभ्या करण्याकरिता जागाच नसल्यामुळे एखाद्याला इजा झाल्यास जबाबदार कोण? यामुळे संबंधित रस्त्यावर उभी असलेल्या वाहनावर कारवाई करण्यात यावी व या वाहनांना योग्य जागा देण्यात यावी अशा आशियाची मागणी बशीर हुस्नुद्दीन शेख यांनी निवेदनाद्वारे डेपो मॅनेजरला व ग्रामपंचायतला केलेली आहे.

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button