संपादकीय

निलंग्यात टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरी

यावेळी टिपू सुलतान यांच्या जीवन चरित्यावर अनेकांनी मनोगत व्यक्त केले.

लातूर: दत्ता कांबळे

जिल्ह्यातील निलंगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शेर-ए-हिंद शहीद टिपू सुलतान यांचीजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वधर्मिय सार्वजनिक जन्मोत्सव समिती निलंगाच्या वतीने अनेकांनी टिपू सुलतान यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी टिपू सुलतान यांच्या जीवन चरित्यावर अनेकांनी मनोगत व्यक्त केले.

या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य, काँग्रेसचे निलंगा तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, आरपीआयचे जिल्हाउपाध्यक्ष अंकुश ढेरे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रमोद कदम, रिपाइंचे विलास सूर्यवंशी, रजनीकांत कांबळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अविनाश रेशमे, माजी तालुका प्रमुख ईश्वर पाटील माजी नगराध्यक्ष हमीद शेख, पंचायत समितीचे माजी अध्यक्ष अजित माने, राष्ट्रवादीचे इस्माईल लदाफ, माजी सभापती असगर अन्सारी, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष महादेवी पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष धम्मानंद काळे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजीब सौदागर, टिपू सुलतान संघटनेचे तालुकाध्यक्ष सबदर कादरी दयानंद चोपणे, गोविंद सुरवसे, देवदत्त सूर्यवंशी, सुनील कांबळे, यांच्यासह सर्वधर्मिय सार्वजनिक जन्मोत्सव समिती निलंगाचे महिला पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button