लोक प्रेरणा

दैनिक मराठवाडा साथी टीम समूहाचे वर्तमान महाराष्ट्र वेब न्यूज च्या वतीने शतशः आभार

दैनिक मराठवाडा साथी टीम समूहाचे वर्तमान महाराष्ट्र वेब न्यूज च्या वतीने शतशः आभार

माजलगाव / प्रतिनिधी
दि.1 जुलै रोजी दै. मराठवाडा साथी च्या वतीने गाव तेथे पत्रकार मोहीम राबवण्यात आली. यास माजलगाव तालुक्यातील पत्रकार होऊ इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की माजलगाव येथील विश्रामगृह येथे दि. 1 जुलै 2022 रोजी दै. मराठवाडा साथी दैनिकासाठी गाव तेथे पत्रकार मोहीम राबवण्यात आली. यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दै. मराठवाडा साथीचे कार्यकारी संपादक प्रशांत जोशी, दै. मराठवाडा साथीचे व्यवस्थापक ओम प्रकाश आप्पा बुरांडे, दै. मराठवाडा साथी जिल्हा प्रतिनिधी संदीप बेद्रे तसेच तालुका प्रतिनिधी कुणाल दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली मुलाखती घेण्यात आल्या. तालुक्यातील इच्छुक उमेदवारांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला यावेळी नव नियुक्त पत्रकारांना नियुक्तीपत्र देऊन नियुक्त करण्यात आले.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून पत्रकार पृथ्वीराज निर्मळ यांच्या जन्मदिनानिमित्त दै. मराठवाडा साथी समूहाच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या. याबद्दल वर्तमान महाराष्ट्र वेब न्यूज परिवार दै. मराठवाडा साथी टीम समूहाचे शतशः आभार वर्तमान महाराष्ट्र वेब न्यूज उपसंपादक- पृथ्वीराज निर्मळ.

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button