लोक प्रेरणा

टपाल विभागाच्या उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

दुचाकी व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

वर्तमान महाराष्ट्र : दत्ता कांबळे
टपाल विभागाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणाऱ्या उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा गुणगौरव सोहळा बुधवारी औरंगाबादचे पोस्ट मास्टर जनरल अदनान अहमद यांच्या हस्ते लातूर येथे संपन्न झाला.
२०२२-२३ या अर्थिक वर्षात इंडीया पोस्ट पेमेंट बॅंकेचे नवीन खाते उघडणे,आधार लिंकींग,टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमामध्ये सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या टपाल विभागातील कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.
यावेळी इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेमधून आधार लिंकींग ड्राइव मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या दोन महीला कर्मचारी दिक्षा स्वामी व अश्विनी शिंदे सह निवृत्ती तेलंग यांचा दुचाकी व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी लातूर-उस्मानाबाद डाकघर अधीक्षक डाॅ.भगवान नागरगोजे, सहाय्यक अधीक्षक आनंद कवठेकर,श्रीकांत माने,शाम गायकवाड,डाक निरीक्षक धनाजी मुंडे, सचिन स्वामी, सुनील नाटकर, अमित गाजरे,पोस्ट पेमेंट बॅंकेचे व्यवस्थापक राजेंद्र लटपटे, चंद्रकांत झेंडे, पोस्टमास्तर भगवान हाळणे,भीमराव पाटील, विकास अधिकारी गोविंद राजे, विपनन अधिकारी सूर्यकांत गुट्टे उपस्थित होते.
सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी बी.सी.माळी यांनी केले. तर सहायक डाकघर अधिक्षक सुनील कोळपाक यांनी आभार मानले.

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button