अवस्था आणि व्यवस्थावर्तमान महाराष्ट्रशैक्षणिक

जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा पात्रुड येथे शिक्षकांना प्रार्थनेचे गांभीर्यच नाही!

शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे पात्रुड जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेचे शिक्षक हे प्रार्थनेस अनुत्तीर्ण

पात्रुड येथील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये

माजलगाव / प्रतिनिधी
तालुक्यातील पातुड येथील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा ही कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत असतेच. मागील काही महिन्यापूर्वी या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी ठेवण्यात आलेल्या टाकी वरती घाणीचे साम्राज्य होते. तर विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या बाथरूम मध्ये आधीच घाण व बंद पडलेल्या अवस्थेत होती. व शाळेच्या परिसरामध्ये केर कचरा व घाणीचे साम्राज्य चोहीकडे पसरलेले होते. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार चालू असल्याचे अनेक वृत्तपत्रांमधून प्रकाशित करण्यात आलेले होते.
याबाबत अनेक दैनिकांनी यावर उठवला होता व या शाळेची सी. ओ. कडे देखील तक्रार करण्यात आलेली असताना येथील शिक्षक हे निगरगट्ट असून त्यांच्यावर कोणाचा वरद हस्त आहे असे पालक व गावकऱ्यातून बोलले जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पात्रुड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दि.१४ सप्टेंबर रोजी दैनिक लोकाशा प्रतिनिधी व पालक सकाळी सात वाजता मुलीस शाळेमध्ये सोडण्यासाठी गेलेले असता. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये प्रार्थनेसाठी तीन महिला शिक्षक हजर होत्या. तर माध्यमिक शाळेमध्ये प्रार्थनेसाठी एकच शिक्षक हजर होता. हे असे येथील शिक्षकांचे प्रार्थनेसाठी गैरहजर राहणे नित्याचेच असून या शाळेमधील शिक्षक हे मुख्यालयीन राहत नसून ते सोयीच्या ठिकाणी राहत असल्यामुळे असे प्रकार नित्याचेच आहेत
पात्रुड येथील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये दिनांक १४ सप्टेंबर रोजी आमच्या प्रतिनिधी व पालकांनी शाळेमध्ये मुलीस सोडवण्यासाठी गेलेले असता सकाळी सात वाजता शाळेस भेट दिली. यावेळी प्रार्थना चालू होती तसेच या शाळेमध्ये प्रार्थनेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये प्रार्थनेसाठी तीन महिला शिक्षिका उपस्थित होत्या तर माध्यमिक शाळेमध्ये प्रार्थनेसाठी एकच शिक्षक उपस्थित होता. तर अनेक शिक्षक हे गैरहजर होते.

असे प्रकार अनेक दिवसापासून चालू असून यावर अनेक वेळा मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी बेडसकर व शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांना वेळोवेळी याबाबत लेखी व फोन द्वारे तक्रारी केल्या असताना देखील, येथील सर्व शिक्षक कर्मचारी तसेच केंद्रप्रमुख आणि गटशिक्षणाधिकारी बेडसकर आणि शिक्षणाधिकारी कुलकर्णी हे एकमेकांची पाठ राखण करतात. यामुळे येथील शिक्षक हे निगरगट्ट झालेले असून प्रार्थनेसाठी गैरहजर राहतात. प्रार्थनेसाठी हजर राहणे हे बंधनकारक असताना देखील पात्रुड जिल्हा परिषद माध्यमिक व प्राथमिक शाळेतील शिक्षक एकमेकाची पाठ राखण करत आळीपाळीने प्रार्थनेसाठी हजर राहतात.
या शाळेमध्ये एकाच शिक्षकांवर प्रार्थना घेतली जाते व येथील शिक्षक हे आपापल्या मर्जीनुसार शाळेत येतात व मर्जीनुसार शाळेतून जातात. यांना कसल्याही प्रकारचे वेळेचे भान राहिलेले नसून. येथील शाळेच्या शिक्षकांवर शिक्षण विभागाचा अंकुश नसल्यामुळे येथे सर्रास पणे येथील शिक्षक हे निगर गट्ट व गेंड्याच्या कातडीचे झालेले आहेत. या शाळेमध्ये शिक्षकांचे वर्तन गैर असल्यामुळे येथील शिपाई देखील त्याचप्रमाणे वागत असून शाळेमध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा पात्रुड येथील शिक्षक हे मुख्यालयीन राहत नसल्यामुळे ते प्रार्थनेस हजर राहत नसून या शिक्षकांची मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्यामार्फत त्यांच्यावर कारवाई होईल का? व मा. अजित कुंभार यांच्या सारखा मा. अजित पवार हे शिक्षकांना धडा शिकवतील का? असा सवाल पालक वर्गातून उपस्थित होत आहे.


शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे पात्रुड जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेचे शिक्षक हे प्रार्थनेस अनुत्तीर्ण असतात व हे सर्व शिक्षक बारी बारी ने प्रार्थनेस हजर राहतात. व एकमेकांची पाठराखण करतात या शाळेमध्ये नित्यनियमाने एकच शिक्षक प्रार्थनेसाठी हजर असतो व एकाच शिक्षकावर प्रार्थना घेतली जाते. बाकी शिक्षक त्यांच्या सोयीनुसार शाळेत येतात व हीच सर्व कर्मचारी मुख्याध्यापक केंद्र प्रमुख गटशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी एकमेकांची पाठराखण करतात. यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याचे काही देणे घेणे नसून ते फक्त टाईमपास म्हणून शाळेमध्ये येतात.

व शासनाची दिशाभूल करतात दिन जाऊ पगार आव या म्हणीप्रमाणे ते मनमानी वागतात. यामुळे येणाऱ्या पिढीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून पालकांमध्ये शिक्षकाप्रती रोशाची भावना निर्माण झाली आहे. ज्या शिक्षकांना प्रार्थनेचेच गांभीर्य नाही असे शिक्षक काय पिढी घडू शकणार? असा सवाल पालक वर्गातून बोललाजात आहे.

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button