कला आणि क्रीडा

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत कराटे मार्शल आर्टस् असोशियशनचे घवघवीत यश.

यशस्वी विद्यार्थ्यांना ग्रँडमास्टर चंद्रमणी डोंगरे व कविता डोंगरे यांचे मार्गदर्शन लाभले

माजलगाव / ( पृथ्वीराज निर्मळ )
बीड येथे २१ व २२ नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत येथील कराटे मार्शल आर्टस् असोशियशनने
घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये मुलामध्ये सुवर्ण पदक चि.आनंद रविंद्र राऊत,यशवंत विठ्ठल सक्राते, शेषराव दत्तात्रय मोरे, अभिजित राठोड सिल्व्हर पदक -सार्थक चंद्रमणी डोंगरे, मयुर केशव दिक्षीत,अजय गवळी, पवनराजे दत्तात्रय क्षिरसागर. तसेच मुलीमध्ये सुवर्ण पदक- कु.सायली खंडागळे, तेजस्विनि सोळंके तसेच सिल्व्हर पदक-कु.दिव्या मगर, कु.शर्वरी बुरांडे, कु.माही साळवे यांनी यश संपादन केले आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना ग्रँडमास्टर चंद्रमणी डोंगरे व कविता डोंगरे यांचे मार्गदर्शन लाभले याप्रसंगी मुक्ताई अर्बन चे विठ्ठल सक्राते व पत्रकार रविंद्र राऊत यांनी सर्व यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आ.प्रकाश सोळंके, माजलगांव प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ.मंगलताई सोळंके, मा.सभापती जयसिंह सोळंके यांनी अभिनंदन केले आहे.

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!
Back to top button