कला आणि क्रीडाशैक्षणिक

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत श्री. सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना क्रिडाध्यापक पंडित मेंडके, श्रीराम शहापुरे यांचे मार्गदर्शन लाभले.

चि. विजय गायकवाड, चि. आनंद राऊत, चि. मयूर दिक्षित यांची विभागीय पातळीवर निवड

माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )
२१ नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत येथील श्री. सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये १७ वर्ष वयोगट व ३५ ते ४० किलो वजन गटात इयत्ता ९ वी ई मधील चि. विजय राज गायकवाड प्रथम, ७० ते ७४ किलो वजन गटात इयत्ता ९ वी ई मधील चि आनंद रवींद्र राऊत प्रथम, तर ५८ ते ६२ किलो वजन गटात इयत्ता ९ वी ड मधील चि मयूर केशव दिक्षित याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना क्रिडाध्यापक पंडित मेंडके, श्रीराम शहापुरे यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलुरकर, उपाध्यक्ष तथा श्री. सिध्देश्वर शैक्षणिक संकुलाच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष जितेश चापसी, कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रा चंद्रकांत मुळे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रकाश दुगड, अमरनाथ खुर्पे, श्री. सिध्देश्वर शैक्षणिक संकुलाच्या प्रशासकीय समितीचे कार्यवाह विष्णुपंत कुलकर्णी, माध्यमिक समितीचे अध्यक्ष प्रशांत भानप, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अप्पाराव यादव, मधुर रुद्रवार, पवन मानधने, लक्ष्मीकांत मोगरेकर, शाळेचे मुख्याध्यापक अनंतराम कोपले सर, उपमुख्याध्यापक विठ्ठलराव काळे सर, पर्यवेक्षक उमेश थाटकर, रवींद्र खोडवे, मिलिंद वेडे, कमलाकर झोडगे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button