ग्रामीण वार्ता

ग्रा.पं. कर्मचाऱ्यांच्या विजयी संकल्प अभियानात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

केज :- प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने बीड येथे २७ नोव्हेंबर रोजी विजयी संकल्प अभियान आयोजित करण्यात आला आहे.या विजयी संकल्प अभियानात केज तालुक्यातून ग्रा.पं. कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे तालुकाध्यक्ष मसू कांबळे,उपाध्यक्ष हमीद शेख,सचिव कल्याण चाटे यांनी केले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बीड येथे २७ नोव्हेंबर रोजी विजयी संकल्प अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानात वेतन, एप्रील २००७ पासुन राहणीमान भत्ता, ऑगस्ट २००५ पासुन १० टक्के आररक्षणा प्रमाणे जिल्हापरिषदे समायोजन, २०१८ मध्ये मा. अभय यावलकर समितीच्या शिफारसी आणि प्रत्येक पाच वर्षानी मिळणारे वाढ़ीव किमान वेतन या सर्व बाबींवर चर्चा होणार आहे.या अभियानासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून ग्रा.पं. कर्मचारी, संघटनेचे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याने माहिती हमीद शेख यांनी दिली आहे.

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!
Back to top button