आपला जिल्हासंपादकीय

खळवट लिमगांव येथे एकलव्य संघटनेची बैठक संपन्न

खळवट लिमगांव येथे एकलव्य संघटनेची बैठक संपन्न

माजलगांव / ( पृथ्वीराज निर्मळ )

वडवणी तालुक्यातील खळवट लिमगांव येथे दि. १७ रविवार रोजी एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य, बीड या संघटनेची खळवट लिमगांव येथे बैठक संपन्न झाली. ही बैठक एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री. शिवाजीराव ढवळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व एकलव्य संघटनेचे जिल्हाअध्यक्ष भारत भाऊ फुलमाळी यांच्या उपस्थितीत खळवट लिमगांव ता. वडवणी येथे एकलव्य संघटनेची मोर्चेबांधणी व शाखा स्थापन पुर्व बैठक घेण्यात आली. या बैठकीत भिल्ल समाजातील अनेक समस्या सह स्वतःचे राहते घर नावाचे होणे, गायरान जमीनी स्वतःच्या नावे करण्यात याव्यात, तसेच समाजातील सर्व मुलाचे जातीचे प्रमाणपत्र आटीव न घालता तात्काळ उपलब्ध करून द्यावीत. या मागण्या शासनाने भिल्ल समाजाच्या हक्काच्या असतानाही मिळत नसल्याने या बैठकीत एकलव्य संघटनेची जिल्हा अध्यक्ष भारत भाऊ फुलमाळी बोलतांना म्हणाले. जर सर्व समाज एकाजुठीने एकत्र आला तर शासन दरबारी आवाज ऊठऊन हक्काचे काम आपण करणार असल्याचे भारत भाऊ फुलमाळी बोलतांना म्हणाले. व एकलव्य संघटनेच्या गाव तिथे शाखा करून भिल्ल समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लढणार असल्याचे एकलव्य संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भारत भाऊ फुलमाळी म्हणाले. यावेळी उपस्थित एकलव्य संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भारत भाऊ फुलमाळी, आप्पा शिंदे, शंकर ढवळे, बिभिशषन, फुलमाळी, बाळासाहेब माळी, सुभाष बर्डे, महादेव बर्डे, दिपक माळी, अमोल बर्डे, सदाशिव पवार, आकाश चाळक, भिमराव बर्डे, बाबासाहेब माळी, काकासाहेब माळी, मधुकर माळी, बलभिम बर्डे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button