शेती विषयक

कृषी सहाय्यक व्ही.टी. राठोड यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न

माजलगाव / ( पृथ्वीराज निर्मळ )
येथील कृषी सहाय्यक व्ही.टी. राठोड हे दि. 30 जून 2022 रोजी सेवा निवृत्त झाले. यानिमित्ताने त्यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ माजलगाव कृषी अधिकारी कृषी चिकित्सालय फळ रोपवाटिका कार्यालयात करण्यात आला.
श्री. व्ही.टी. राठोड हे शिस्तप्रिय, वक्तशीरपणा, नियमबद्धता, मनमिळाऊपणा, सहकार्याची भावना, व शांत स्वभाव असे गुणवैशिष्ट्ये त्यांच्या अंगीकृत होते.
त्यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ कार्यक्रम कृषी अधिकारी राहुल आळते यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमास कृषी अधिकारी श्री. राहुल आळते, गणेश थोरात, सचिन साळवे, तुकाराम निसर्गध व सहकारी कर्मचारी उपस्थितीत होते.
सेवापूर्ती सत्कार समारंभ कार्यक्रम कृषी चिकित्सालय फळ रोप वाटिका कार्यालयच्या वतीने करण्यात आला. कृषी अधिकारी श्री. राहुल आळते यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला.

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!
Back to top button