कला आणि क्रीडासंपादकीय

ऑल इंडिया ओपन कराटे चॅम्पियनशिप ओके नाय गो जोरू आयोजित स्पर्धेतुन माजलगांवच्या १२ खेळाडुंची इटली येथे होणार्‍या स्पर्धेसाठी निवड

ऑल इंडिया ओपन कराटे चॅम्पियनशिप ओके नाय गो जोरू आयोजित स्पर्धेतुन माजलगांवच्या १२खेळाडुंची इटली येथे होणार्‍या स्पर्धेसाठी निवड

माजलगांव / ( पृथ्वीराज निर्मळ) ऑल इंडिया ओपन कराटे चॅम्पियनशिप ओके नाय गो जोरू आयोजित पवार सर यांच्या मार्गदर्शना खाली स्पर्धेचे आयोजन दि.६ जुन २०२२ रोजी मुंबई केले होते.या स्पर्धेमध्ये भारतामधून सर्व राज्यांचे स्पर्धक आले होते. तसेच या स्पर्धेमधून भारतातील स्पर्धक निवड समितीचा आयोजन केलेलं होतं. या समितीमध्ये ११ निवड समितीचे सदस्य होते. या समितीचे माध्यमातुन इटली येथील स्पर्धेकरिता निवडी साठी होती. या समिती मध्ये चंद्रमनी डोंगरेसर यांचा सहभाग होता. माजलगावच्या विद्यार्थ्यांनी अनेक दिवसापासून या स्पर्धेचा पाठपाठपुरावा करून स्पर्धेसाठी मेहनत घेऊन या स्पर्धेमध्ये एकूण बारा विद्यार्थी इटली येथे होणार्‍या जागतिक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

यामध्ये पवनराजे क्षिरसागर, आर्यन डोंगरे, आनंद राऊत, सार्थक डोंगरे, यशवंत सक्राते, राजविर जाधव, सुमित सुतार, पार्थ भुतडा, सतिश जाधव, सुशिलकुमार गोबरे, अ‍ादित्य राजेभोसले, मयुर दिक्षित या विद्यार्थ्यांचा सहभाग होणार आहे.डोंगरेसर गेल्या २५ – ३० वर्षापासून कराटे प्रशिक्षण माजलगाव येथे देत आहेत. त्यांचे विद्यार्थी अनेक वर्षापासून मेडल घेऊन येत आहेत. कित्येक वर्षापासून विदेशात म्हणजे इटलीसारख्या देशांना जाण्याचे योगदान आपल्या बीड जिल्ह्याला लाभत आहे.

या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, बाबुराव पोटभरे, सभापती अशोक डक, सभापती जयसिंह सोळंके, दयानंद स्वामी, विश्वंभर थावरे, कचरू खळगे, डॉ.चव्हाण, जयदत्त नरवडे, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तुकाराम येवले, राकेश साळवे, राजेश घोडे, फ्लाईंग बर्डचे चेअरमन चांडक सर या सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी जगातून गोड मेडल घेऊन येण्यासाठी शुभेच्छा दिल्या.तसेच मुक्ताई अर्बन पतसंस्थे मार्फत सक्राते सर व त्यांच्या टीमने इटली येथे जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे दि.११ शनिवार रोजी पतसंस्थेत सायं. ७ वा. हार व पुस्तकं देऊन सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. यावेळी विठ्ठल सक्राते, इंजि.काकडे, महेश फपाळ, बालाजी कुंडकर, राहुल राऊत, शत्रुघ्न कसबे, दिपक कटके, कृष्णा सितकर, चैतन्य कदम इतर कर्मचारी व पालक मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button