लोक प्रेरणासंपादकीय

उप प्रादेशिक कार्यालय अंबाजोगाई यांच्या विरोधात अन्याय अत्याचार भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या आमरण उपोषणास लोक जनशक्ती पार्टीचा जाहीर पाठिंबा – शहराध्यक्ष प्रदीप गुंडरे

उप प्रादेशिक कार्यालय अंबाजोगाई यांच्या विरोधात अन्याय अत्याचार भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या आमरण उपोषणास लोक जनशक्ती पार्टीचा जाहीर पाठिंबा…. शहराध्यक्ष प्रदीप गुंडरे
अंबाजोगाई :
अंबाजोगाई उपप्रदेशक कार्यालय येथे लर्निंग लायसन घोटाळा व भ्रष्टाचाराच्या विरोधात उपोषणाला बसलेले मोहम्मद ताहेर बाई यांना लोक जनशक्ती पार्टीचे शहराध्यक्ष प्रदीप गुंडरे व विद्यार्थी आघाडीचे तालुका अध्यक्ष आदित्य चौरे यांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला सविस्तर माहिती अशी की अंबाजोगाई उपप्रदेशिक कार्यालयामध्ये लर्निंग लायसन्स संदर्भात विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोरील फुटेच्या हार्ड व सॉफ्ट कॉपी प्रत देण्यास उपप्रादेशिक कार्यालयाने टाळाटाळ करत असल्यामुळे संबंधित कार्यालयाच्या विरोधात उपोषण करण्यात येत आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येते ती परीक्षा अंबाजोगाई उपपरादेशी कार्यालय हे पैसे घेऊन मॅनेज करत आहे असे वारंवार निवेदन देऊन सुद्धा त्याच्यावर कसलीच कारवाई होत नसल्यामुळे संबंधित कार्यालयाच्या विरोधात उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले आहे लवकरात लवकर जर या उपोषणाची दखल घेऊन संबंधित प्रश्न सोडवले नाही तर सर्व सामाजिक संघटना व पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा लोक जनशक्ती पार्टीचे अंबाजोगाई शहर अध्यक्ष प्रदीप गुंडरे यांच्या वतीने उपप्रादेशिक अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button