पोलिस वार्तावर्तमान महाराष्ट्र

आय.पी.एस. डॉ. बी. धिरज कुमार यांची दमदार एन्ट्री, काळ्या बाजारात जाणारा ७ लाख ३४,५०० च्या तांदळासह ४५ लाखाचा मुद्देमाल जप्त.

आय.पी.एस. अधिकारी डॉ. बी. धीरजकुमार यांनी हा ट्रक दुपारी तालखेड फाटा येथे पकडला.

माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )
माजलगाव येथे नव्याने सुरू झालेले आय.पी.एस. अधिकारी डॉ. बी. धीरजकुमार यांनी माजलगाव तालुक्यात दमदार एन्ट्री करत तालुक्यातील तालखेड फाटा येथे गुजरात येथील काळया बाजारात जाणारा तांदूळ काल दि. ७ नोव्हेंबर २०२२ रोजी तालखेड फाटा येथे दुपारच्या वेळेस गुजरात कडे जाणारा तांदळाचा अशोक लेलँड कंपनीचा १४ टायरचा ट्रक क्र. एम.ए.२१-बी.जी. २२१८ या ट्रक मधून राशन चा तांदूळ लोड केलेला अशोक लेलँड कंपनीचा ट्रक जात असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांने दिली त्यावरून आय.पी.एस. अधिकारी डॉ. बी. धीरजकुमार यांनी हा ट्रक दुपारी तालखेड फाटा येथे पकडला. यावेळी पोलिसांना ट्रक मध्ये राशनचे कट्टे असल्याचे निदर्शनास आले ते मोजले असता २९ हजार ३८० क्विंटल वजनाचा तांदूळ भरला असून पंचवीस रुपये किलो प्रमाणे या तांदळाची किंमत ७ लाख ३४५०० रुपये तर मालवाहतूक करणारा ट्रक अशोक लेलँड कंपनीचा ट्रक याची किंमत ३८ लाख रुपये असा सर्व मिळून मुद्देमाल व ट्रकसह ४५ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करीत ही कारवाई केली. हा ट्रक हैदराबाद येथून राशन चा तांदूळभरून गुजरातला जात असल्याचे आरोपीने पॉलिसी खाक्या दाखविताच सांगितले पोलीस नाईक अतिश कुमार देशमुख यांच्या फिर्यादीवरून आरोपी जयेश मुकुंद पगारे, विकास संजय हिवराळे राहणार इब्राहिमपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना यांच्याविरोधात माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button