आपला जिल्हालोक प्रेरणासंपादकीय

आयुर्वेद शास्त्रात आजाराला दूर ठेवण्याचेसामर्थ्य – डॉ. ना. दि. वारकरी

सामाजिक उपक्रमांनी गणेश उत्सव होणे हाच खरा गणेश उत्सवाचा उद्देश आहे.

मोफत आरोग्य शिबिरात घेतला २२० रुग्णांनी लाभ

क्रांतीवीर गणेश मंडळाचा उपक्रम
माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )
दि.७ शहरातील जुना तहसील रोड भागातील क्रांतीवीर गणेश मंडळाच्या वतीने बुधवार रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरात अस्थी विकाराचे १५८, दंत विकाराचे ६२ तर रक्त तपासणी ७० अशा २२० रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या असून याचा लाभ रुग्णांनी  घेतला.
शहरातील झेंडा चौक येथिल क्रांतिवीर गणेश मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन दि. ७ बुधवार रोजी  करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराचे उद्घाटक म्हणून  मा. आ. राधाकृष्ण होके पाटील हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आयुर्वेद तज्ञ डॉ. नारायण वारकरी हे होते. अस्थिरोग तज्ञ डॉ. गणेश आगे, दंत रोग तज्ञ डॉ. शुभम सूर्यवंशी, अभय होके पाटील, सामाजिक कार्यकर्ते बालासाहेब ताकट, दत्ता महाजन, ईश्वर होके, दत्ता रांजवण, इम्रान खान, आसिफ शेख आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी बोलतांना डॉ. वारकरी म्हणाले की, आज वैद्यकीय सेवा ही आजारावर मात करण्यासाठी काम करते. मात्र आपल्याला आजार होऊ नये त्यांना आपल्यापासून दूर ठेवण्याचे काम आयुर्वेद शास्त्र ठेवते. क्रांतीवीर गणेश मंडळाच्या वतीने आपल्या भागात जे शिबीर घेतले ते खरोखर कौतुकास्पद आहे. सामाजिक उपक्रमांनी गणेश उत्सव होणे हाच खरा गणेश उत्सवाचा उद्देश आहे. तसेच यावेळी माजी आ. राधाकृष्ण होके पाटील यांनी मार्गदर्शन केले.
या शिबिरात मणक्याचे विकार, संधिवात, आमवात, गुडघेदुखी, कंबरदुखी यांची तपासणी अस्थिरोग तज्ञ डॉ. गणेश आगे यांनी तर दाताची तपासणी डॉ. शुभम सूर्यवंशी या तज्ञ डॉक्टरांनी केली. अस्थी विकाराचे १५८, दंत विकाराचे ६२ तर रक्त तपासणीमध्ये थायरॉईड, कॅल्शियम यासह गरजेनुसार ७० रुग्णांच्या तपासण्या करण्यात आली. या शिबिरात २२० रुग्णांना तपासण्या मोफत करून औषध गोळ्या देण्यात आल्या. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी क्रांतीवीर गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांनी परिश्रम घेतले.

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button