अवस्था आणि व्यवस्थापोलिस वार्ता

अर्थपूर्ण व्यवहारातून ग्रामीण पोलिसांचा पात्रुड, लऊळ येथील अवैद्य धंद्याकडे कानाडोळा ?

दैनिकांमधून अवैद्य धंद्यावाल्याच्या बातम्या प्रकाशित होत असताना देखील एस. पी. साहेबांचे याकडे दुर्लक्ष का?

माजलगाव: (पृथ्वीराज निर्मळ) पात्रुड हे गाव जवळपास २० हजार लोकसंख्या असलेले गाव असून या गावाच्या आजूबाजूस असलेल्या वीस ते पंचवीस गावातील लोकांची याच ठिकाणाहून ये-जा वरदळ असते. याचाच फायदा घेत काही शॉर्टकट पद्धतीने पैसा कमावणारांनी येथे अवैध धंदे सुरू केलेले असून मटका नावाचा जुगार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालतो. परंतु ग्रामीण पोलीस याकडे अर्थपूर्ण कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे.

मटका किंग मालामाल ; जनता मात्र कंगाल

गावामध्ये अनेक अवैद्य धंदे राजरोसपणे सुरू आहेत.
याचाच फायदा घेत पात्रुड पासून तीन किलोमीटर असलेल्या लऊळ या ठिकाणी देखील मटका, गावठी दारू, पत्त्यांचे क्लब राजरोसपणे चालू आहेत.
लऊळ हे गाव सिंदफणा नदीवर जायकवाडी प्रकल्पा शेजारी असल्यामुळे येथील शेतकरी हे सधन शेतकरी असून गावामध्ये नोकरदार व गरीब मजूर लोक राहतात. परंतु ग्रामीण पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अवैद्य धंद्याचे लोन लऊळ येथे देखील मोठ्या प्रमाणात पसरले आहे.

पात्रुड येथे पोलीस चौकी असून देखील येथील चौकी मध्ये पोलीस कर्मचारी हजर नसतात. यामुळे येथील लोकांना या पोलीस चौकीचा काहीही उपयोग होत नाही. याच पोलीस चौकी अंतर्गत लऊळ हे गाव येत असून पोलिसांचा मात्र अवैध धंदेवाल्यावर कसलाच प्रकारचा अंकुश राहिलेला नसून राज रोज पणे त्यांच्या नाकावर टिचून मटका, भवरा तितली, गावठी दारू, पत्त्यांचे क्लब असे अवैध धंदे चालू असून.

पोलिसांच्या हप्ते खोरीमुळे मटका किंग अवैद्य धंद्यावाले मालामाल झाले. परंतु येथील जनता झाली कंगाल अशी अवस्था येथील जनतेची झालेली आहे.
वारंवार दैनिकांमधून अवैद्य धंद्यावाल्याच्या बातम्या प्रकाशित होत असताना देखील

एस. पी. साहेबांचे याकडे दुर्लक्ष का?

माजलगाव ग्रामीण पोलीस याकडे कानाडोळा करत असून कारवाई शून्य का? असा सवाल येथील जनतेतून विचारला जात आहे. अशा अवैध धंद्याचा सर्वसामान्य जनतेस त्रास होत असून ग्रामीण पोलीस अवैद्य धंदे करणाऱ्या बकासुरावर

कारवाई करून येथील जनतेस न्याय देतील का?

हे धंदे गावामधून हद्दपार करतील का? मटका, तितली भवरा, दारू, पत्त्यांचे क्लब यावर कारवाई करून पोलीस जनतेचा विश्वास संपादन करतील का? असे एक ना अनेक प्रश्न येथील जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेले असून याची चर्चा गावामध्ये होत आहे.

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button