पोलिस वार्ता

अखेर सोयाबीन गंज पेटवणाऱ्या अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल

अंदाजे सोयाबीन पीक ६० ते ७० पोते जळून खाक झाले आहे. अशा आशयाची फिर्याद

माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )
तालुक्यातील पात्रुड येथील शेतकरी ओमहरी सखाराम जंगले यांची शेत जमिनीवर पात्रुड शिवारात सर्वे नंबर ६२ मध्ये असून यामध्ये या शेतकऱ्याने सोयाबीन पीक लागवड केलेली होती पीक कापणी करून सोयाबीन ची गंजी शेतात जमा करून मध्यभागी लावला होती परंतु त्या गंजीस अज्ञात इसमाने आग लावून पेटवून दिली होती. शेतकरी ओमहरी सखाराम जंगले यांच्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत माहिती आशी की, पात्रुड शिवारातील सर्वे नंबर ६२ मध्ये ओमहरी सखाराम जंगले यांचे ३ एक्कर शेत आहे. या शेतामध्ये त्यांनी सोयाबीनचे पीक घेतले होते सोयाबीन पिकाची काढणी करून सोयाबीन गोळा करून त्याची गंज शेताच्या मध्यभागी करून ठेवली होती. मात्र अज्ञात व्यक्तीने दिनांक १९ नोव्हेंबर सायंकाळी ६ व २० नोव्हेंबर सकाळी ७ च्या पूर्वी अज्ञात व्यक्तीने सोयाबीन गंजीस आग लावून पेटवून दिली. यामध्ये अंदाजे सोयाबीन पीक ६० ते ७० पोते जळून खाक झाले आहे. अशा आशयाची फिर्याद माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन माजलगाव येथे शेतकरी ओम हरीसखाराम जंगले यांनी दि.२४ नोव्हेंबर २०२२ रोजी फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून अखेर अज्ञात इसमाविरुद्ध कलम ४३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास ये. एस. आय. सुनील आईटवार हे करत आहेत.

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button