सहाय्यक फौजदार जालिंदर वावळकर यांचे दुःखद निधन!


एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी हरपला
माजलगाव / प्रतिनिधी
धारुर तालुक्यातील कारी या गावचे सुपुत्र श्री. जालिंदर वावळकर हे १९९३ मध्ये पोलीस सेवेत भर्ती झाले या २९ वर्षाच्या काळामध्ये आपली सेवा बजावताना त्यांनी सर्वांशी जिव्हाळ्याचे व मैत्रीचे संबंध ठेवले अधिकारी असो सोबतचे सहकारी कर्मचारी असो किंवा पब्लिक असो सर्वांशी त्यांनी मैत्रीचे संबंध ठेवले ते सर्वांचे परिचित होते यामुळे त्यांचा मित्रपरिवार व परीचय मोठ्या प्रमाणात होता. व पोलीस दलामध्ये त्यांची एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळख होती. पण काही दिवसापासून सहाय्यक फौजदार श्री. जालिंदर वावळकर हे आजारी होते आणि अशातच दि. २५ मे रोजी ११:१५ वाजता त्यांच्या राहत्या घरी आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळ गावी धारुर तालुक्यातील कारी येथे सायंकाळी ६ वाजता करण्यात आला यावेळी त्यांचे सहकारी बीडचे पोलीस उपनिरीक्षक श्री. जाधवर, माजलगावचे सहाय्यक फौजदार श्री. नरवाडे, श्री. कांबळे, श्री. बिनवडे, श्री. देशमुख यांनी श्रद्धांजली वाहिली व त्यांनी अतिशय चांगला जिवलग मित्र, मनमिळावू , कर्तव्यनिष्ठ अधिकारी हरपल्याची खंत व्यक्त केली. त्यांच्या या अशा अकाली निधनाने कारी या गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नातेवाईक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पाठीमागे पत्नी दोन मुले दोन मुली असा परिवार आहे त्यांच्या दुःखात वर्तमान महाराष्ट्र न्यूज परिवार सहभागी होऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.