शाळेच्या नावाखाली पाच एक्कार जमीन विकायला काय मुकुंदराज शाळेचे अध्यक्ष व संचालक मंडळ जागेचे मालक आहेत काय? लोकजनशक्ती पार्टी

मुकुंदराज शाळेचे अध्यक्ष व संचालक मंडळ जागेचे मालक आहेत काय?
अंबाजोगाई: शहरातील प्रभाग क्रमांक 11 लाल नगर क्रांती नगर येथील मुकुंदराज प्राथमिक शाळे समोरील अंदाजे पाच एकर जागा अनधिकृत रित्या मुकुंदराज शाळेचे अध्यक्ष व संचालक मंडळ हडप करण्याच्या हेतूने त्याच्यावर जेसीबी व लेव्हलिंग ट्रॅक्टर द्वारे काम करून प्लॉटिंग पाडत आहेत विशेष करून या जागेच्या आसपास लाल नगर क्रांतीनगर ही वस्ती असून वीस ते पंचवीस वर्षापासून येथे जवळपास चारशे ते पाचशे कुटुंब वास्तव्यास आहेत या वस्तीच्या बाजूलाच स्नेह स्नेहा नगर यांच्या गृहनिर्माण संस्थेचे अधिकृत समशान भूमी आहे या स्मशानभूमी ला याच रिकाम्या जागेतून रस्ता जातो व या रिकाम्या जागेमध्ये लाल नगर येथील लग्न समारंभ व इतर लहान-मोठे कार्यक्रम होतात विशेष करून या पूर्ण भागांमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी या जागे शिवाय दुसरी जागा नसल्यामुळे लहान मुले या जागेवर खेळतात परंतु मुकुंदराज शाळेचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी संगनमत करून संबंधित जागेवर प्लॉटिंग पाडण्याचा घाट घातला आहे याचा विरोध म्हणून आज लोकजनशक्ती पार्टी च्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई यांना रीतसर निवेदन देण्यात आले की संबंधित पाच एकर जागा ही शासनाची असताना मुकुंदराज शाळेला येथे प्लॉटिंग पाडण्यास कोणी परवानगी दिली याची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे यावेळी लोक जनशक्ती पार्टीचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष युवा राजेश भाऊ वाहुळे पत्रकार मोहम्मद ताहेर भाई राजाराम मामा कुसळे युसुफ भाई आदित्य चौरे अकबर शेख मुखरांम भाई पठाण व इतर.