माजलगाव विधानसभा शिवसेनेचा भव्य मेळावा शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न


माजलगाव विधानसभा शिवसेनेचा भव्य मेळावा शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
माजलगाव ( पृथ्वीराज निर्मळ )
शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब, मराठवाडा संपर्क नेते चंद्रकांतजी खैरे, बीड जिल्हा संपर्कप्रमुख आनंदरावजी जाधव साहेब यांच्या आदेशाने आज राजस्थानी मंगल कार्यालय माजलगाव येथे शिवसेनेचा भव्य मेळावा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षिरसागर, माजी राज्यमंत्री बदाम आबा पंडित, बीड जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शिवसेना बीड जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी मार्गदर्शन करताना जयदत्त आण्णा क्षिरसागर म्हणाले की, मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सभेकडे जिल्ह्यातील जनता पहात आहे. जर गाव गड्याचा विकास करायचा असेल तर गल्ली पासून मुंबई पर्यंत एका विचाराचे लोकप्रतिनिधी निवडून द्यायला हवेत. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब हे शेतकर्यांचा कष्टकर्यांचा विचार करणारे सरकार आहे. ठाकरे सरकार केलेली कामे शिवसैनिकांनी घरोघरी पोहचवणे आवश्यक आहे असं सल्ला यावेळी त्यांनी शिवसैनिकांनी केला.
तसेच यावेळी माजी राज्यमंत्री बदाम आबा पंडित यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, येत्या ८ जून जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचे विचार ऐकण्यासाठी यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी येणाऱ्या काळात पक्ष मजबूत करण्यासाठी गाव तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक निर्माण करण्या आवाहन केले. तसेच शेतकऱ्यांसाठी शिवसेना वेळोवेळी आंदोलने करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा काम शिवसेना करते. यापुढील काळात शिवसेना खंबीरपणे शेतकऱ्यां पाठिशी उभा राहून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सभे करीता माजलगाव विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गाव, तांडा, वाडी येथून शिवसैनिक आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचे विचार ऐकण्यासाठी येणार. प्रत्येक शिवसैनिक या सभेसाठी येणारच आहेत त्यासाठी जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव आवश्यक तेथे सोय देखील करणार आहेत.
या मेळाव्याचे सुत्रसंचलन कल्याण बल्लाळे यांनी केले.यावेळी उपस्थित युवासेना जिल्हाधिकारी शुभम ढाके, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामराजे सोळुंके, वडवणी तालुका प्रमुख संदीप माने, धारूर तालुका प्रमुख बाळासाहेब कुरंद, जिल्हा समन्वयक संजय भाई महाद्वार, जिल्हा संघटक रामदास भाई ढगे, वडवणी चे माजी तालुका प्रमुख विनायक मुळे, माजी नगरसेवक अशोक आळणे, शिवमुर्ती कुंभार, विधानसभा समन्वयक दासू पाटील बादाडे, उपतालुकाप्रमुख नामदेव सोजे, माऊली कदम, संजय शिंदे,माऊली गोंडे,तालुका सचिव प्रभाकर धरपडे, ज्येष्ठ शिवसैनिक प्रलाद दादा सोळंके, तीर्थराज पांचाळ, संभाजी पाष्टे, बंडु मामा जाधव, युवराज शिंदे, भरत पास्टे, शिवाजी चव्हाण, नारायण तौर, प्रल्हाद घाटुळ कामराज डाके, जयराम राऊत, करण थोरात, बाळासाहेब मेंडके, आयाज शेख, राम कुलकर्णी, माऊली काशीद, रुपेश घोडके, प्रदीप तांबे, अभिजीत देडे, कल्याण मोहिते,महादेव वैराळे, महादेव सुरवसे, लखन गायकवाड आप्पा सुरवसे विजय लगड, गणेश मात्रे रमेश कुरकुटे, सुखदेव धुमाळ, विष्णू कड,