माजलगाव तालुक्यातील सादोळा येथे किसान सभेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन संपन्न
माजलगाव तालुक्यातील सादोळा येथे किसान सभेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन संपन्न

माजलगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील सादोळा येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सेक्रेटरी मुसद्दीक बाबा सर यांच्या नेतृत्वाखाली किसान सभेचे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले
दिनांक 31 जुलै रविवार रोजी अखिल भारतीय किसान सभेने दिलेल्या हाकेनुसार माजलगाव तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले सादोळा येथील किसान सभेच्या आंदोलनाचे नेतृत्व माकपचे तालुका सेक्रेटरी मुसदीक बाबा सर यांनी केले या आंदोलनात केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करून येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर लढा उभा करण्यात येईल असे बाबा सर यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले
यावेळी सिटू संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष शिवाजी कुरे यांनी मार्गदर्शन केले त्यांनी केंद्र सरकारने अन्नधान्यावरील लावलेली 15 टक्के जीएसटी त्वरित रद्द करावी व शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे असे आव्हान केंद्र सरकारला केले.
या आंदोलनात खालील मागण्या करण्यात आल्या बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेने त्वरित नवीन कर्ज वाटप चालू करावे सन 2020 चा विमा त्वरित वाटप करण्यात यावा प्रोत्साहन पर मिळणारे 50 हजार रुपयांचे त्वरित वाटप करण्यात यावे रासायनिक खताच्या किमती कमी करण्यात याव्या शेती उपयुक्त साहित्य जीएसटी करा मधून वगळण्यात यावे उत्पादनावर आधारित दीडपट हमीभावाचा कायदा त्वरित करावा स्टेट बँक ऑफ इंडिया व महाराष्ट्र ग्रामीण बँक यांनी शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज त्वरित वाटप करण्यात यावे या मागण्याचे निवेदन तहसीलदार यांच्यावतीने आलेल्या प्रतिनिधींला देण्यात आले.
या आंदोलनात माकप तालुका सचिव मसुद्दीक बाबा सर सिटू संघटनेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी कुरे किसान सभेचे तालुकाध्यक्ष कृष्णा सोळंके अशोक पोपळे शरद शिंदे गौतम सोळंके विलास एरंडे गणपतराव जाधव पांडुरंग सोळंके पांडुरंग शिंदे प्रशांत निळकंठ प्रल्हाद सोळंके गणेश कदम दशरथ सोळंके गजानन सोळंके इत्यादींनी सहभाग नोंदवला व आंदोलन यशस्वी केले.