पोलिस वार्ताबीड जिल्हा

नायब तहसीलदार “आशा वाघ (गायकवाड)” वर कार्यालयातच केला कोयत्याने हल्ला.

तहसील कार्यालय केज

केज येथील तहसील कार्यालयात घुसून नायब तहसीलदार आशा वाघ यांच्या मानेवर आणि डोक्यात कोयत्याचे वार

केज/प्रतिनिधी:

केज येथील तहसील कार्यालयात घुसून नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर कौटुंबिक कलहातून त्यांच्या सख्या भावानेच कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज सकाळी घडली आहे. नायब तहसीलदार आशा वाघ यांच्या मानेवर व डोक्यात वार करण्यात आल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे.

या बाबतची अधिक माहिती मिळाली ती अशी की,

आशा वाघ या येथील तहशील कार्यालयात नायब तहसीलदार पदावर कार्यरत आहेत. नेहमीप्रमाणे आज सकाळी त्या कार्यालयात आपले काम करत होत्या. सुमारे सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास त्यांचा सख्खा भाऊ मधुकर दयाराम वाघ (४५, दोनडिगर ता. चाळीसगाव जि. जळगाव) हा कार्यालयात आला. त्याने काही कळायच्या आत बहिण आशावर कोयत्याने मानेवर व डोक्यावर प्राणघातक हल्ला केला. आशा वाघ याच अवस्थेत जीवाच्या भितीने शेजारील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात धावल्या. दरम्यान, कार्यालयात उपस्थित नागरिकांनी हल्लाखोर भाऊ मधुकर यास पकडून ठेवले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे.

आशा वाघ यांची प्रकृती गंभीर असून त्यांना अधिक उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 हल्याचे कारण शेती व कौटुंबिक वाद
हल्लेखोर मधुकर वाघ आणि नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यात काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरु आहेत. शेतीच्या आणि अन्य वादातून त्यांने टोकाचे पाऊलं उचलत आज जळगाव येथून येत थेट कार्यालयात घुसून सख्या बहिणीवर जीवघेणा हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हल्लेखोर भाऊ मधुकर यास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

Show More
Back to top button