ध्येय करियर अकॅडमीचे प्राचार्य तथा संचालक विनायक सरवदे यांना राज्यस्तरीय तंत्र स्नेही पुरस्कार जाहीर
ऑनलाइन च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण


ध्येय करियर अकॅडमीचे प्राचार्य तथा संचालक विनायक सरवदे यांना राज्यस्तरीय तंत्र स्नेही पुरस्कार जाहीर
माजलगाव / ( पृथ्वीराज निर्मळ )
शहरातील ध्येय करियर अकॅडमीचे प्राचार्य तथा संचालक विनायक सरवदे यांनी गेल्या दहा वर्षापासून शिक्षण क्षेत्रात नव नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ केली असून शिक्षण क्षेत्रामध्ये ज्ञानदान देण्याचे काम करत ते आहेत. त्यांनी कोरोना काळामध्ये देखील ध्येय करियर अकॅडमी व ध्येय इंग्लिश मंदिर स्कूलच्या माध्यमातून प्रा. विनायक सरवदे यांनी विद्यार्थ्यांना स्टेम होम सेफ होम ऑनलाइन च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण व दर्जेदार शिक्षण देत घरबसल्या विद्यार्थी घडवत शिक्षणाचा टक्का व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवत गुणवत्तेत वाढ केली.
व तसेच ध्येय करियर अकॅडमीच्या माध्यमातून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत मध्ये तसेच पोलीस, पी.एस.आय., तलाठी, ग्रामसेवक, बँकर्स क्लार्क असे अनेक क्षेत्रातील विद्यार्थी शिक्षण घेऊन जनसेवा देण्याचे काम करत आहेत.
प्राध्यापक विनायक सरवदे यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये गेल्या दहा वर्षा पासून अद्यावत तंत्रज्ञानाचा व शिक्षणाचा वापर करत शिक्षण क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत त्यांनी अल्पावधीतच शिक्षण क्षेत्रात उंच भरारी घेतलेली असून त्यांच्या या कार्याची दखल घेत श्रीमती रुक्मिणी बाई भिमराव चव्हाण सेवाभावी संस्था व जनकल्याण प्रतिष्ठान माजलगाव यांच्या वतीने शिक्षण क्षेत्राचा “राज्यस्तरीय तंत्र स्नेही” ( उपक्रमातील ) शिक्षक पुरस्कार २०२२-२३ जाहीर झाला आहे. याबद्दल तालुक्यातील सर्व स्तरातून प्रा. विनायक सरवदे यांचे कौतुक होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.