

माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र ) जून २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या कंपनी सेक्रेटरी परिक्षेत भारतातून प्रथम क्रमांक पटकाविलेल्या व मूळ माजलगाव ची असलेली आणि सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेली वैष्णवी बद्रीनारायन बियाणी हिचा दि.१४ जुलै रोजी आय.सी.एस.आय. कडून सन्मान करण्यात आला.या सन्मान सोहळ्यात वैष्णवी ला एकूण २२ प्रमाणपत्र,१७ चेक,२ गोल्ड मेडल आणि ३ सिल्व्हर मेडल प्रदान करण्यात आले आहे. वैष्णवी च्या या यशाबद्दल आय.सी.एस.आय.कडून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.तिच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.